Ind vs NZ, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतासमोरील समस्यांना उत्तर काय?

Ind vs NZ, 2nd Test : खासकरून के एल राहुलच्या हरवलेल्या फॉर्मवर चर्चा होतेय. 

40
Ind vs NZ, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतासमोरील समस्यांना उत्तर काय?
  • ऋजुता लुकतुके

पहिली बंगळुरू कसोटी गमावल्यामुळे आणि त्यातही पहिला डाव ४६ धावांत गुंडाळला गेल्यामुळे भारतीय संघातील त्रुटीच सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यातच रिषभ पंतला झालेली दुखापत, के एल राहुलचा हरवलेला फॉर्म आणि फिरकीपटूंना न मिळालेलं यश यांच्या पार्श्वभूमीवर पुणे कसोटीतील खेळपट्टीचीही जोरदार चर्चा सुरू आहे. बघूया पहिल्या कसोटीतील भारतासमोरचे कच्चे दुवे आणि त्याला भारतीय संघाचं अपेक्षित उत्तर. (Ind vs NZ, 2nd Test)

भारतासाठी घरच्या मैदानावर झालेला पराभव हा अलीकडच्या काळात दुर्मिळ क्षण आहे. यापूर्वी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही भारताने पहिली कसोटी गमावली होती. पण, त्यानंतर चोख प्रत्युत्तर देऊन मालिका ४-१ ने जिंकली. या गोष्टीला काही महिनेच झाले आहेत. तेव्हाचा इंग्लिश संघ भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी तयार नव्हता आणि संघातील फिरकीपटू अगदीच नवखे होते. तसं आताच्या किवी संघाचं नाही आणि रचिल रवींद्रने आपला फॉर्मही दाखवून दिला आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतही भारतीय संघाचा कस लागणार आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा – Maharshtra Assembly Election 2024 : ज्यांनी दिली बंडामध्ये साथ तेच झाले पहिल्या यादीतून बाद; वाचा कोण आहेत ‘ते’ आमदार?)

पहिला कस लागेल तो संघ निवडीत आणि खेळपट्टीची अचूक परीक्षा करण्यात. शुभमन गिल आता दुखापतीतून सावरलाय. तो उपलब्ध असेल तर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवून मधल्या फळीत के एल राहुलला वगळणार की सर्फराझला, याचा निर्णय रोहीत आणि गंभीरला घ्यावा लागेल. के एल राहुल सध्या फॉर्ममध्ये नाही. पण, गौतम गंभीरचा त्याच्यावर विश्वास आहे. त्याचवेळी सर्फराझने बंगळुरू कसोटीत १५० धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला वगळणंही कठीण जाणार आहे. अशावेळी फलंदाजांची फळी नेमकी कशी असेल ते संघ प्रशासनाला ठरवायचं आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

रिषभ पंत तंदुरुस्त आहे का आणि तंदुरुस्त असेल तर यष्टीरक्षण करणार का हा दुसरा प्रश्न आहे. कारण, फक्त फलंदाज म्हणूनही तो संघात येऊ शकतो. पण, मग यष्टीरक्षणाची जबाबदारी राहुल नाहीतर ध्रुव जुरेलला घ्यावी लागेल. जुरेलला त्यासाठी संघात जागा करून द्यावी लागेल. जर वॉशिंग्टन सुंदरला संघात जागा द्यायची झाली तर कुलदीप यादवला बाहेर बसावं लागेल. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा – UBT ला धक्का; संभाजी ब्रिगेडने सोडली साथ)

फलंदाजांच्या फळीबरोबरच भारताचं लक्ष खेळपट्टीकडेही असेल. पुण्याच्या गहुंजेतील मैदानावरील ही खेळपट्टी गोलंदाजांनाच साथ देते असं आतापर्यंत दिसून आलं आहे. पण, त्याचवेळी इथं अनियमित उसळीही दिसते. त्यामुळे खेळपट्टी ओळखून गोलंदाजांची निवड करणं महत्त्वाचं ठरणार आहे. कदाचित सिराज ऐवजी आकाशदीपला संधी मिळाली तर इथल्या उसळीचा तो चांगला फायदा करून घेऊ शकतो. ३ फिरकीपटू खेळवायचे झाले तरी ते तिघे कोण असतील ही निवड संघ प्रशासनाला हुशारीनेच करावी लागणार आहे. रचिन रवींद्रला रोखू शकेल असा फिरकीपटू भारताला थोडक्यात शोधायचाय. (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.