- ऋजुता लुकतुके
जगातील एक मोठी टेक कंपनी गुगलने नेतृत्वात मोठा बदल केला आहे आणि विशेष म्हणजे भारतीय नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. अलीकडे कार्यकारी अधिकाऱ्या इतक्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तंत्रज्ञान अधिकाऱ्यावर सोपवल्या जातात. आणि गुगलने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून प्रभाकर राघवन यांची नियुक्ती केली आहे. यात आणखी एक भाग आहे तो एआय विकासाचा. येत्या दिवसांमध्ये एआय तंत्रज्ञान विकास हे टेक कंपन्यांसाठी महत्त्वाचं लक्ष्य असणार आहे आणि त्या दृष्टीनेही ही नेमणूक महत्त्वाची मानली जात आहे. (Google New CTO)
राघवन यांची जागतिक स्तरावर सर्च इंजिन तज्ञ म्हणून ओळख आहे. अल्गोरिदन, सर्च आणि डेटाबेस यावर त्यांनी गेली २० वर्षं काम केलं आहे. त्यांच्या नावावर १०० च्या वर शोध निबंध आहेत आणि २० पेटंटही आहेत. १२ वर्षांपूर्वी राघवन गुगलमध्ये दाखल झाले होते आणि सुरुवातीपासून ते गुगल सर्च असिस्टंट, गुगल ॲड्स आणि ई कॉमर्स तसंच जीपे यावर काम करत आहेत. या उत्पादनांमधूनच कंपनीचं सर्वाधिक उत्पन्न येतं. (Google New CTO)
(हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन Chhota Rajan ला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! )
विशेष म्हणजे गुगल सारखी सर्चवर आधारित कंपनी स्वत: सुरू करण्याचा घाट त्यांनी १९९० मध्ये घातला होता. तशी ब्लूप्रिंट त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात सादर केली होती. त्यानंतर लॅरि पेज आणि सर्जी ब्रिन यांनी १९९८ मध्ये गुगलची स्थापना केली. तेव्हा राघवन यांनी याहू सर्चमध्ये नोकरी सुरू केली होती. गुगल कंपनीत सुंदर पिचाई यांचा विश्वासू माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कंपनीतील सगळ्यात ५ जास्त पगार असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. शेअर आणि मासिक पगार व भत्ते मिळून गेल्यावर्षी त्यांना ३०० कोटी रुपयांचा मोबदला मिळाला होता. (Google New CTO)
राघवन यांनी भोपाळ, चेन्नई आणि मँचेस्टरमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी भोपाळच्या कॅम्पियन स्कूलमधून शालेय शिक्षण आणि आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे. राघवन यांनी आयआयटी मद्रास म्हणून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर युसी बर्कले मधून पीएचडी पूर्ण केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अगदी वाहतूक नियमनाबरोबरच जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठीही होऊ शकतो, असं अलीकडेच त्यांनी म्हटलं होतं. गुगलची पुढील दिशा आणि संशोदन विकास हा एआय क्षेत्रातच अपेक्षित आहे. त्यामुळे प्रभाकर राघवन यांचा अनुभव कंपनीला उपयोगी पडणार आहे. (Google New CTO)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community