Vijaya Rahatkar यांनी पदभार स्वीकारला; दिले ‘हे’ आश्वासन

114
Vijaya Rahatkar यांनी पदभार स्वीकारला; दिले 'हे' आश्वासन

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया किशोर रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी अधिकृतपणे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यासोबतच आयोगाचे सुरू असलेले प्रयत्न पुढे नेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याच वेळी, लिंग-आधारित हिंसाचाराला बळी पडलेल्यांना न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि महिलांच्या अधिकारांना पुढे नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर जोर दिला.

आज महिलांना भेडसावणाऱ्या समस्या ओळखून रहाटकर म्हणाल्या, ‘ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती मी माझ्या क्षमतेनुसार पार पाडण्याचा प्रयत्न करेन.’ यापूर्वी पदभार स्वीकारणाऱ्या रेखा शर्मा यांचेही त्यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या की, शर्माजींनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी सुरू केलेले काम मी चालू ठेवणार आहे.

(हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन Chhota Rajan ला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! )

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी प्रमुख रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी त्यांच्या कार्यकाळातील दोन प्राथमिक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. प्रथम, महिलांवरील गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार परले जाईल, याची खात्री करणे आणि दुसरे म्हणजे, अशा गुन्हेगारांना कायदेशीर परिणामांची भीती वाटेल, असे वातावरण तयार करणे.

रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी आयोगाच्या कामाविषयी लोकांमध्ये असलेल्या समजाबदलही सांगितले की, आयोगाचे सर्व प्रयत्न दिसत नाहीत, परंतु एनसीडब्ल्यू आपले काम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. त्या म्हणाल्या, ‘सगळं काही पुढे येत नाही, पण आयोग काम करीत राहतो. आम्ही आमचे प्रयत्न वाढवत राहू.’

(हेही वाचा – माहीमची लढत ठरली; Amit Thacheray यांना दोघांचे आव्हान)

पंतप्रधान मोदींचे मानले आभार

रहाटकर (Vijaya Rahatkar) असेही म्हणाल्या की, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांची वाढती संख्या हा आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. असे गुन्हे करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या लोकांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि असा गुन्हा करण्याचा विचारही कुणी करू नये.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.