NCP Candidate List : राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या यादीत ६ नवे चेहरे; जाणून घ्या कोण आहेत ‘हे’ उमेदवार

213
NCP Candidate List : राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या यादीत ६ नवे चेहरे; जाणून घ्या कोण आहेत ‘हे’ उमेदवार
NCP Candidate List : राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या यादीत ६ नवे चेहरे; जाणून घ्या कोण आहेत ‘हे’ उमेदवार

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूकीचे (Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधक मंडळीने विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात सुरुवात केली आहे. अशातच महायुतीचे मित्र पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाने बुधवार २३ ऑक्टोबर रोजी पक्षाने पहिली यादी (NCP Candidate List)  जाहीर केली. यामध्ये एकूण ३८ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. असून, त्यामध्ये सहा नव्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात (Vadgaon Sheri Assembly Constituency) राष्ट्रवादी पक्षाकडून सस्पेन्स कायम आहे. तर दुसरीकडे वडगाव शेरीवरून सुनील टिंगरे यांची धाकधूक वाढली आहे.    (NCP Candidate List) 

पहिल्या यादीमध्ये (NCP Candidate List) राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना, आंबेगावमधून आशुतोष काळे यांना, कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून ६ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये हिरामण खोसकर (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते), सुलभा खोडके (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते), राजकुमार बडोले (पूर्वाश्रमीचे भाजपा नेते), नजीब मुल्ला, निर्मला विटेकर आणि भरत गावित (माणिकराव गावित यांचे पुत्र, भाजपा) यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन Chhota Rajan ला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी

  • बारामती- अजित पवार
  • येवला- छगन भुजबळ
  • आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
  • कागल- हसन मुश्रीफ 
  • परळी- धनंजय मुंडे
  •  दिंडोरी- नरहरी झिरवाळ
  • अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
  • श्रीवर्धन-  आदिती तटकरे
  • अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
  •  उदगीर- संजय बनसोडे 
  • अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  • माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
  • वाई- मकरंद पाटील
  • सिन्नर- माणिकराव कोकाटे
  • खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
  • अहमदनगर शहर- संग्राम जगताप
  •  इंदापूर- दत्तात्रय भरणे
  • अहमदपूर- बाबासाहेब पाटील
  •  शहापूर- दौलत दरोडा
  •  पिंपरी- अण्णा बनसोडे
  •  कळवण- नितीन पवार
  • कोपरगाव- आशुतोष काळे
  • अकोले – किरण लहामटे
  • वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  • चिपळूण- शेखर निकम
  • मावळ- सुनील शेळके
  • जुन्नर- अतुल बेनके
  • मोहोळ- यशवंत माने
  •  हडपसर- चेतन तुपे
  •  देवळाली- सरोज आहिरे
  • चंदगड – राजेश पाटील
  • इगतुरी- हिरामण खोसकर
  • तुमसर- राजे कारमोरे
  • पुसद -इंद्रनील नाईक
  • अमरावती शहर- सुलभा खोडके
  • नवापूर- भरत गावित
  •  पाथरी- निर्णला विटेकर
  • मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.