भारताचा अनमोल वारसा असलेली महाकाली गुंफा (mahakali caves) ही मुंबईतल्या जोगेश्वरी येथे लेण्यांच्या रूपात स्थित आहे. ही गुंफा जोगेश्वरी रेल्वे स्थानकापासून येथे फक्त तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
जोगेश्वरी गुंफा मंदिर हे भारतातलं सर्वात लांब गुंफा मंदिर आहे. महाभारताच्या काळात पांडव वनवासात असताना या ठिकाणी आले तेव्हा या गुंफेनेच त्यांना आश्रय दिला होता असं म्हटलं जातं.
महाकाली गुंफा (mahakali caves) हिला गुंफादेवी मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. या गुंफेमध्ये इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंतच्या १९ दगडी लेण्यांचा संग्रह आहे.
(हेही वाचा – Mahayuti चे १८२ उमेदवार जाहीर; MVA चा तिढा अजून कायम)
महाकाली गुंफेची ऐतिहासिक पार्श्वभूमी
मुंबईतल्या इतर लेण्यांप्रमाणेच महाकाली गुंफा (mahakali caves) ही बाह्य बाजूने आतल्या बाजूला डोंगर पोखरून तयार करण्यात आली आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन सहाव्या काळातल्या या गुंफेला कोंडिविटा गावाच्या जवळ असल्यामुळे कोंडिविटा लेणी म्हणूनही ओळखलं जातं. डोंगराच्या उतारावर जंगलांमध्ये बांधलेल्या ‘महाकाली’ मंदिराच्या नावावरून या गुंफेला महाकाली गुंफा असं नाव देण्यात आलं.
महाकाली गुंफा ही इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंतच्या १९ दगडी स्मारकांचा संग्रह आहे. या गुंफेमधला लेण्यांचा वायव्य दिशेचा गट चौथ्या ते पाचव्या शतकातला आहे. तर दक्षिण-पूर्व दिशेचा गट त्यांपेक्षाही जुना आहे. खडक कापून तयार करण्यात आलेली ही गुंफा (mahakali caves) प्राचीन सम्राट अशोकाच्या साम्राज्यापासून अस्तित्वात आहेत. २,००० वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षूंनी बौद्ध भिक्कूंनी या गुंफेचा उपयोग निवासस्थान आणि ध्यान कक्ष म्हणून केला होता. या गुंफेमध्ये एक स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे. तसंच महाकालीचं आणि गणपतीचं मंदिरही आहे.
(हेही वाचा – Commonwealth Games 2026 : राष्ट्रकूल खेळांतून हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, नेमबाजी या खेळांची गच्छंती)
महाकाली गुंफेची वैशिष्ट्ये
येथे १९ कोरीवकाम केलेल्या आणि रिकाम्या गुहा आहेत. या गुंफेच्या टेकडीच्या दोन्ही बाजूंना निवासस्थान आणि प्रार्थनागृहे असलेल्या खोल्या आहेत. त्या खोल्यांवर स्तूप आणि घुमटही आहेत. महाकाली गुंफेच्याच्या दर्शनी भागात चार गुहा, पायऱ्या आणि खांब असलेला व्हरांडा आणि एक गर्भगृह आहे. इथे बाहेरील मंडपाच्या भिंतींमध्ये अवलोटिकेश्वर आणि बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित मूर्ती कोरलेल्या आहेत. जवळच्याच दुसऱ्या गुंफेमध्ये (mahakali caves) चार खांबांच्या आधाराने तयार केलेला एक सभामंडप आहे.
निवासस्थानाच्या खोलीच्या मागच्या भागात अशाच १५ गुंफा आहेत. या गुंफा व्हरांड्याला पायऱ्यांद्वारे जोडलेल्या आहेत. त्यांपैकी एका गुंफेमध्ये स्तूपाचं प्रतीक कोरलेलं आहे. ही गुंफा (mahakali caves) येथे राहणाऱ्या भिक्कूंच्या प्रमुखाचे निवासस्थान किंवा हीनयान पंथाचे प्रतीक असावे असं म्हटलं जातं. यांतील सर्वात मोठ्या गुंफेमध्ये बौद्ध कथा दर्शविणारी सात कोरीव कामंही केलेली आहेत. कान्हेरी लेण्यांप्रमाणेच या लेण्यांमध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. या भागात गोड्या पाण्याचे अनेक साठे असावेत.
(हेही वाचा – Ind vs NZ, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतासमोरील समस्यांना उत्तर काय?)
महाकाली गुंफा म्हणजे गतवैभवाचा खजिनाच आहे
ही फक्त गुंफा (mahakali caves) नसून गतवैभवाचा खजिनाच आहे. इथल्या मुख्य गुंफेच्या एका दरवाज्यातून बाहेर पडताना सुमारे दहा खांब असलेला एक लांब भव्य सभामंडप आहे. एका बाजूला दुमजली गुहा आहेत. तर गुंफेचा मधला भाग कोसळून अंगणासारखा दिसू लागला आहे. शिवमंदिर, महाकाली मंदिर, जोगेश्वरी देवी मंदिर आणि गणपतीच्या मंदिरासोबतच इथे एक हनुमान मंदिरही आहे. या मंदिराकडे जाण्याचा मार्ग मोठ्या प्रांगणातून जातो. या प्रांगणाच्या दोन्ही बाजूंना गुंफा आहेत. कधीकाळी येथे दत्ताचे मंदिरही असावं, पण काही भागात गुंफेचं छत कोसळल्यामुळे आता त्या मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडून टेकडीवरून जावं लागतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community