BJP च्या २३ उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शोधला ‘हा’ मुहूर्त

77
BJP च्या २३ उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शोधला 'हा' मुहूर्त
BJP च्या २३ उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शोधला 'हा' मुहूर्त

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly) दि. २९ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. त्यात अनेक दिग्गज नेते दि. २४ ऑक्टोबरचा गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून आपले उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल करणार आहेत. (BJP)

( हेही वाचा : Google New CTO : गुगलचे नवीन मुख्य तंत्रज्ञान अधिकारीही भारतीयच, प्रभाकर राघवन यांच्यावर विश्वास

दरम्यान भाजपाने (BJP) सर्वात आधी ९९ उमेदवारांची यादी जाहिर केल्याने भाजपाचे उमेदवार लवकरच उमेदवारी अर्ज भरतील, अशी चर्चा होती. त्यानुसारच भाजपाचे २४ नेते दि. २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तसेच भाजपातील प्रमुख नेते देखील त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उपस्थित राहतील. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, उदयराजे भोसले, रावसाहेब दानवे, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार हे उमेदवारांच्या अर्ज भरण्यावेळी सहभाग घेतील. यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्ययलायाकडून उमेदवारांच्या नावाची अधिकृत यादी ही जाहीर करण्यात आली आहे. (BJP)

२३ भाजपा उमेदवार भरणार अर्ज

शाहाड- राजेश पडवी
नंदूरबार- विजयकुमार गावित
धुळे- अनुप अग्रवाल
सिंदखेड- जयकुमार रावल
शिरपूर- किशाराम पावरा
धामणगाव- प्रताप अडसड
हिंगणघाट- समीर कुणावर
गोंदिया- विनोद अग्रवाल
राळेगाव- अशोक उके
बदनापूर- नारायण कुचे
गंगापूर- प्रशांत बोंब
मुलूंड- मिहीर कोटेचा
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
चारकोप- योगेश सागर
अंधेरी पश्चिम- अमित साटम
विलेपार्ले- पराग अळवणी
वडाळा- कालिदास कोळंबकर
कोथरुड- चंद्रकांत दादा पाटील
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
तुळजापूर- राणाजगजीतसिंह पाटील
कराड दक्षिण- सुरेश भोसले
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
सांगली- सुधीर गाडगीळ

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.