- प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक यांचे बिगुल वाजले आहे. महायुतीकडून १८२ उमेदवारांची यादी आतापर्यंत जाहीर झालेली आहे. असे असताना देखील हा महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. सध्या उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ होताना दिसून येत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवार कसोशीचे प्रयत्न करत आहेत.
नरिमन पॉईंट भागात उमेदवारांची धावपळ
सर्वच राजकीय पक्षांची कार्यालय ही नरिमन पॉईंट आणि मंत्रालय परिसरात असल्यामुळे इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची पक्ष कार्यालय तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आसपास दिसून येत आहे. त्यातच प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्यावरती एक धाकधूक पाहावयास मिळत आहे. जे उमेदवार पत्रकारांना चांगले ओळखतात त्यांना खाजगीत माझे नाव यादीत आहे का ? अशी विचारणा करताना दिसत आहे.
नरिमन पॉईंट भागात भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे कार्यालय, शिवसेना उबाठाचे शिवालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान देखील या भागात आहे. त्यामुळे सत्ता समीकरणांचे केंद्रस्थानी नरिमन पॉईंट झाले आहे. सर्व हालचाली याच भागात होत असल्याने त्याचप्रमाणे हॉटेल ट्रायडेंट मध्ये नेते मुक्कामाला असल्यामुळे या भागांमध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नरिमन पॉईंट च्या या भागामध्ये सध्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठका होत असल्यामुळे येथूनच काहीतरी माहिती आपल्याला मिळेल या आशेने उमेदवार आणि त्यांचे समर्थक या भागांमध्ये फिरताना दिसत आहे.
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=Ku-VXlh67_I
Join Our WhatsApp Community