Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रतिबंधक कारवाईला सुरुवात

99
Maharashtra Assembly Election : राज्यात ९.७ कोटी मतदार; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या?
  • प्रतिनिधी 

विधानसभा निवडणूका २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरासह उपनगरात प्रतिबंधक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे तसेच पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवणे, तसेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील एका आठवड्यात पोलिसांनी मुंबई तसेच उपनगरातील ४० वेगवेगळ्या भागांमध्ये केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रामध्ये तीक्ष्ण आणि धारदार हत्यारे, देशी कट्टे आणि बेकायदेशीर बंदुकांचा समावेश आहे. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : आचारसंहिता म्हणजे नक्की असतं तरी काय?)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका २०२४ चे बिगुल वाजले आहे. प्रत्येक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, तसेच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यांची संपूर्णपणे जबाबदारी पोलीस खात्याची आहे. निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहेत. पोलिसांनी निवडणुका जाहीर होताच, मुंबई शहरासह उपनगरात प्रतिबंधक कारवाईला सुरुवात केली आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – UBT गटाच्या यादीत प्रिंटीग मिस्टेक, पहिली बाद दुसरी सुधारित)

मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याकडून बेकायदेशीर धंदे करणारे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असून आठवड्याभरात पोलिसांनी दक्षिण मुंबईत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी १२ गुन्हे, मध्य मुंबईत १० गुन्हे, पूर्व उपनगरात १५, पश्चिम उपनगरात १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात तलवार, चॉपर, सुरे आणि देशी कट्टे इत्यादी बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. दरम्यान अभिलेखावरील गुन्हेगारांना नोटीस देऊन त्यांना समज देण्यात येत आहे. ही कारवाई निवडणूका संपेपर्यंत सुरू असेल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.