Assembly Election 2024 : बिनशर्त नाही तर महायुती आणि महाविकास आघाडीशी दोन हात करणार मनसे

101
Assembly Election 2024 : बिनशर्त नाही तर महायुती आणि महाविकास आघाडीशी दोन हात करणार मनसे
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाल्यानंतर मनसेने मंगळवारी आपल्या ४८ उमेदवारांची यादीच जाहीर केली. परंतु यापूर्वी दोन उमेदवार आणि आता ४८ उमेदवार अशाप्रकारे ५० उमेदवारांची नावे मनसेने जाहीर करत महायुतीला बिनशर्त नाही तर स्वबळावरच निवडणूक लढवत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असली तरी त्यांनी आपल्या शब्दाला जागत स्बळावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – UBT गटाच्या यादीत प्रिंटीग मिस्टेक, पहिली बाद दुसरी सुधारित)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत मात्र हा बिनशर्त पाठिंब्याऐवजी स्वबळावरच आपली ताकद दाखवण्याबरोबरच आजमवण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेने शिवडी विधानसभेतून यापूर्वी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा केली होती. तसेच पंढरपूर विधानसभा मतदार संघातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानंतर मनसेने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्याने ते पुन्हा एकदा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यापूर्वीच मनसेने ४८ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात माहिममधून अमित ठाकरे आणि वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव, कल्याण ग्रामीण मधून प्रमोद पाटील आदींसह ४८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : आचारसंहिता म्हणजे नक्की असतं तरी काय?)

यामध्ये मुंबईतील १८ उमेदवारांचा समावेश आहे, तर उर्वरीत ३२ उमेदवार हे मुंबई बाहेरील राज्यातील विधानसभांमधील आहेत. तर महायुतीकडून मुंबईतील १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीपेक्षा मनसेकडून अधिक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आल्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीला मनसेने टक्कर देणार हे स्पष्ट झाले आहे. यापैकी केवळ माहीम विधानसभेमध्ये काही समझोता होऊ शकतो, हे वगळता कुठल्याही मतदारसंघात मनसे पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.