Assembly Election 2024 : अमित ठाकरेंसाठी वरळी पॅटर्न की थेट लढतच?

104
Assembly Election 2024 : अमित ठाकरेंसाठी वरळी पॅटर्न की थेट लढतच?
  • सचिन धानजी, मुंबई

माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्रे अमित हे निवडणूक रिंगणात उतरले असून ठाकरेंच्य या युवराजांसाठी हाच मतदार संघ पोषक आहे. या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे सरासरी ४० हजार मतदार असून शिवसेना आणि भाजपाची मते जर अमित ठाकरे यांच्याकडे वळल्यास ही लढत दोन भावांच्या पक्षांमध्ये होणार आहे. मात्र, दोन्ही शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ४ नोव्हेंबर नंतरच या लढतीचा निकाल स्पष्ट होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघात भाजपाचे मतदार हे निर्णायक ठरणार असल्याने ते अमित ठाकरे की सदा सरवणकर यांना मतदान करतात यावरच विजयाचा झेंडा रोवला जाणार आहे. (Assembly Election 2024)

माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे तीन, भाजपा एक, मनसे एक आणि शिवसेना एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आले होते. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा प्रभाग १९४ आणि मनसेतून निवडून येत उबाठा शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या हर्षला मोरे यांचे प्रभाग अंशंता येत आहेत. तर उबाठाचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य यांचा प्रभाग १८२, माजी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचा प्रभाग १९१ आणि प्रिती पाटणकर यांचा प्रभाग १९२ हे तीन पूर्ण मतदारसंघ आहे. तर भाजपाच्या माजी नगरसेविक शीतल गंभीर यांचा प्रभाग १९० हा प्रभाग येत आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Khar Gymkhana कडून सुप्रसिद्ध महिला क्रिकेटरचं सदस्यत्व रद्द, वडिलांवर धर्मांतराचे आरोप!)

माहीम मतदारसंघात मनसेचे सरासरी ४० हजार मतदार आहेत. तर महायुतीचे सदा सरवणकर यांनी मागील काही महिन्यांपासून विकासकामांचा धडाका लावला आहे. तसेच उबाठा शिवसेनेचे महेश सावंत यांनी माहीम, वडाळा आणि धारावी विधानसभा क्षेत्रात चांगल्याप्रकारे संघटनात्मक बांधणी केल्याने शिवसैनिकांमध्ये ते प्रिय बनले आहेत. त्यामुळे महेश सावंत यांनी विभागातील केलेली बांधणी ही सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतात, असेही दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

शिवसेनेच्या बंडानंतर ही निवडणूक प्रथमच होत असली तर मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना तब्बल १४ हजारांचे मताधिक्य दिले होते. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा उमेदवारासाठी अनुकूल आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचा पारडे जड वाटत असले तरी प्रत्यक्षात बाळासाहेबांचे नातू हे या ठाकरेंच्या अंगणात उभे राहिल्याने त्यांचा पराभव होऊ नये यसाठी शिवाजीपार्क आणि दादर माहीमधील जनता दक्ष असेल. यापूर्वी बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे हे वरळीतून लढले होते, तर अमित ठाकरे हे शिवसेना भवनाच्या अंगणातून लढत आहे. या मतदारसंघात शिवसेना भवन, बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रीय स्मारक, बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक, चैत्यभूमी, बाळासाहेबांचे बालपण गेलेली इमारत, कृष्णकुंज, शिवतिर्थ आदी वास्तू आहे. त्यामुळे या मतदारसंघातून बाळासाहेबांच्या नातवाचा आणि राजसाहेब ठाकरे यांच्या युवराजांचा पराभव होणे हे कुणाही मतदाराला पटणारे नसल्याने येत्या ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत यापैकी कोण माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Aircraft Bomb Threat Case : भारत सरकारने ‘एक्स’ला खडसावले)

त्यामुळे वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीतील परतफेड करण्यासाठी महेश सावंत यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाऊ शकते तसेच महायुतीकडून लोकसभा निवडणुकीची भरपाई म्हणून बिनशर्त पाठिंबा देत सरवणकर यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, असाही अनुमान लावला जात आहे. त्यामुळे येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत या विधानसभेत तिरंगी, दुरंगी आणि बिनविरोध होईल हे स्पष्ट होणार आहे. (Assembly Election 2024)

सन २०१७ च्या निवडणुकीत मनसेला मिळालेली मते

प्रभाग १८२ : ५४७६

प्रभाग १८९ (अंशत:) : ५९२०

प्रभाग १९० : ७७६९

प्रभाग १९१ : ८२८७

प्रभाग १९२ : ८४२८

प्रभाग १९४ अंशत: : ६६८४

मनसेला माहीम विधानसभेतील मतदान

सन २०१९ : ४२,६९०

सन २०१४ : ४०,३५०

सन २००९ : ४८,३७४

शिवसेनेला माहीम विधानसभेतील मतदान

सन २०१९ : ६१,३३७

सन २०१४ : ४६,२९१

सन २००९ : ३९, ८०८

भाजपाला माहीम विधानसभेतील मतदान

सन २०१४ : ३३,४४६

काँग्रेसला माहीम विधानसभेतील मतदान

सन २०१९ : १५,२४६

सन २०१४ : ११,९१७

सन २००९ : ३९,८०८

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.