Baba Siddique हत्या प्रकरणातील अकरावी अटक

120
Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव
  • प्रतिनिधी 

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने अकराव्या आरोपीला अटक केली आहे. अमित हिसमसिंग कुमार (२९) असे अटक करण्यात आलेल्या अकराव्या आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेला अकरावा आरोपी अमित हा या गुन्ह्यात फरार असलेला मोहम्मद झिशान अख्तर याच्या संपर्कात होता व त्याने झिशान सिद्दीकीला या प्रकरणात आर्थिक मदत केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अमित हिसमसिंग कुमार हा मूळचा हरियाणा राज्यातील कैथल जिल्हा, कलायत तालुक्यात राहणारा आहे. मुंबई गुन्हे शाखेने त्याला हरियाणा येथून अटक केली आहे, अमित हा तिसरा अटक आरोपी गुरमेलच्या जिल्ह्यातील असून त्या ठिकाणी तो दारूचा ठेका चालवतो. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी तुरुंगातून सुटलेला झिशान अख्तर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून अमितला भेटला होता. अख्तरने अमितच्या बँक खात्यात २.५० लाख रुपये ट्रान्सफर केले होते. अमितने आठ हप्त्यांमध्ये पैसे काढून अख्तरला दिले.

(हेही वाचा –Aircraft Bomb Threat Case : भारत सरकारने ‘एक्स’ला खडसावले )

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने खुलासा केला की, अमितवर कैथलमध्ये यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत ज्यात प्राणघातक हल्ला आणि दंगलीचे आरोप आहेत. कैथल येथील रहिवासी असलेल्या अमितचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. अख्तर बाबा सिद्दीकी यांच्या (Baba Siddique) हत्येची योजना आखत होता याची पूर्ण जाणीव असलेल्या अमित कुमार ने अख्तरला आर्थिक सहाय्य केल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आणखी एक अटक करण्यात आलेला संशयित गुरमेल सिंग हा देखील अमितच्या जिल्ह्यातील आहे. अमित आणि गुरमेल या दोघांची ओळख झिशान अख्तरशी एका मित्राने करून दिली होती.

पकडले जाण्याच्या भीतीने लपून बसलेल्या अमितला मुंबई गुन्हे शाखेने हरियाणात अटक केली. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात आमदार मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यातील मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि दोन प्रमुख सूत्रधार झिशान अख्तर आणि शुभम लोणकर हे अद्याप फरार आहेत. ते देशातून पळून जाऊ नयेत यासाठी त्यांच्या विरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.