- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मनसेचे गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या गेलेल्या खडकवासला विधानसभेतील स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर आता त्यांचा गोल्डन बॉय निवडणूक रिंगणात उतरणार आहे. मनसेने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – MVA चा फॉर्म्युला ८५-८५-८५, मग संजय राऊतांनी २७० हा आकडा आणला कुठून?)
खडकवासला विधानसभेत निवडणुकीत सन २००९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रमेश वांजळे हे निवडून आले होते. रमेश वांजळे हे मनसेत गोल्डन मॅन म्हणून ओळखले जात होते. परंतु वांजळे यांचे २०१० मध्ये निधन झाल्यानंतर सन २०११ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत मनसेने उमेदवार न देता एकप्रकारे रमेश वांजळे यांना श्रद्धांजली वाहिली. या पोटनिवडणुकीत भाजपाचे भिमराव तापकीर हे विजयी झाले आणि त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाचे तापकीर हे निवडून येत आहेत. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Assembly Election : हॉटेल ट्रायडेंट आणि नरिमन पॉईंट भागात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी ?)
परंतु आता मनसेने या खडकवासला विधानसभेतून रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मयुरेश वांजळे हा रमेश वांजळे यांचासारखाच दिसत असून मयुरेश वाघ काही दिवसांपूर्वी राज ठाकरे याच्या भेटीला आलेला असतानाच त्यांनी मयुरेशचा उल्लेख वाघाचा छावा असा केला होता. मयुरेश वांजळे यांनी पुढील २५ वर्षांचा विकासाचा रोड मॅप तयार करून राजसाहेबांसमोर ठेवला. त्यानंतरच मयुरेशला मनसेने उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community