Assembly Election 2024 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत तक्रार समित्या गठीत

113
Assembly Election 2024 : उबाठा शिवसेना, काँग्रेसमध्ये घोळात घोळ; जाहीर केलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार होणार असल्याने या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी तक्रार सह विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

तक्रार निवारण समिती

भारत निवडणूक आयोग यांच्या मानकानुसार निवडणूक कालावधीत जप्त केलेली रक्कम मुक्त करण्याबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे मुंबई शहराच्या अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हयातील १७८-धारावी, १७९-सायन कोळीवाडा, १८०-वडाळा, १८१-माहिम या विधानसभा मतदारसंघांसाठी तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : गोल्डन मॅनचा गोल्डन बॉय आता मनसेकडून निवडणूक रिंगणात)

मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्ह्यातील १८२-वरळी, १८३-शिवडी, १८४-भायखळा, १८५-मलबार हिल, १८६-मुंबादेवी, १८७-कुलाबा या विधानसभा मतदार संघांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये एक समन्वयक व एक सदस्य नेमण्यात आले आहेत. सदर समिती पोलीस, एफएसटी, एसएसटी या टीमने केलेल्या रोख रक्कम जप्तीच्या प्रत्येक प्रकरणाबाबत स्वतः चर्चा करेल आणि निष्कर्षांपर्यंत पोहोचेल.

जप्त केलेली रक्कम मुक्त करण्याबाबत निर्णय

जेथे जप्ती विरुद्ध एफआयआर तक्रार दाखल करण्यात आली नाही किंवा जप्तीचा कोणत्याही उमेदवाराशी संबंध नाही, अशा राजकीय पक्ष किंवा प्रचारक इत्यादींना मानककारक प्रणालीनुसार अशी रोख रक्कम सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील. ज्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे, अशा सर्व तक्रारीची चौकशी करेल आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देईल व जप्त केलेली रक्कम मुक्त करण्याबाबत निर्णय घेईल. या समितीचा कालावधी आचारसंहिता सुरू झाल्यापासून मतदान संपन्न झाल्याच्या दिनांकानंतर सात दिवसापर्यंत कार्यरत राहील.

(हेही वाचा – CM Eknath Shinde ‘या’ दिवशी भरणार उमेदवारी अर्ज)

निवडणूक खर्च निरीक्षण समिती

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी मतदार संघनिहाय निवडणूक खर्च निरीक्षण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.