Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या पाठोपाठ आता जळगावात सापडली रोकड!

96
Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या पाठोपाठ आता जळगावात सापडली रोकड!
Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या पाठोपाठ आता जळगावात सापडली रोकड!

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांकडून सर्वत्र तपासणी सुरू आहे. पुण्यातील खेड-शिवापूर परिसरातून एका गाडीतून 5 कोटींची रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याच दरम्यान आता अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडू तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी चोपडाई तपासणी नाक्यावर लाखो रुपयांची रक्कम सापडली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Pune Traffic Changes : दिवाळीनिमित्त पुणे शहराच्या वाहतुकीत बदल)

जळगावच्या (Jalgaon) अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर लाखोंची रक्कम सापडली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान तेथ 16 लाख 38 हजार रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लाखो रुपयांची ही रक्कम पथकाने उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात पंचनामा करून जप्त केली. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: ‘हे’ ४५ मोठे नेते आज भरणार उमेदवारी अर्ज; पाहा संपूर्ण यादी)

सापडलेले पैसे हे 10 लाख रुपयांच्या वर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान हे पैसे ज्या वाहनात सापडले ते एका व्यापाऱ्याची कापसाची रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.