Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ

1274
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
Bmc ने हाती घेतले अव्वाच्या सव्वा प्रकल्प; खर्च भागवण्यासाठी आता कर्ज उभारण्याची आली वेळ
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महानगर पालिकेच्यावतीने (Bmc)अव्वाच्या सव्वा प्रकल्पांची कामे हाती घेऊन खर्च वाढवून ठेवल्याने भविष्यात या खर्चाचा डोलारा संभाळण्यासाठी महापालिकेला कर्ज (Loan)उभारण्याची गरज भासणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे  १६ हजार कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज दाखवून अर्थसंकल्पाचा (Budget)आकडा वाढवण्यात आला असला तरी आता प्रत्यक्षात प्रकल्प कामांसाठी झालेला तथा होणारा खर्च तसेच घटलेला महसूल हे लक्षात घेता महापालिकेला आगामी आर्थिक वर्षांत अंतर्गत तथा बाहेरुन कर्ज उभारण्याची गरज भासणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

(हेही वाचा- मुसलमानाशी निकाह करणारी हिंदु अभिनेत्री Chahatt Khanna ची घरवापसी)

मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०२४- २५ चा तब्बल ५९  हजार ८९७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालिन  महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी फेब्रुवारी २०२४मध्ये सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेच्या(Bmc) रस्ते (Road), पर्जन्य जलवाहिन्या(SWD), पूल( Bridges), सागरी किनारा रस्ता प्रकल्प(Coastal road), गोरेगाव मुलुंड लिंक रोड (GMLR), मलनिःसारण प्रक्रिया केंद्र (STP)अशा बऱ्याच मोठ्या भांडवली प्रकल्पांची कामे सुरु  असल्याने या अर्थसंकल्पीय अंदाजावरील निवेदनामध्ये ०१ एप्रिल २०२४ रोजी एकूण १,९९,२८३.६३ कोटी  रुपये इतक्या प्रकल्प कामांचा खर्च निश्चित केला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या प्रकल्प खर्चाच्या रकमेत जवळपास ३४६८३.६० कोटी रुपये एवढी वाढ झाली दर्शवली गेली होती.

परंतु आजमितीस मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या यासर्व प्रकल्प कामांचा एकूण खर्च हा २,३३,९६७.२३ कोटी रुपये एवढा झाला आहे. या एवढ्या प्रकल्प कामांच्या खर्चाला प्रशासक स्थायी समिती व प्रशासक महापालिकेने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे एकाबाजुला महसूली उत्पन्नानात वाढ न होता त्या तुलनेत भांडवली खर्चात लक्षणीय वाढ झालेली आहे. (Bmc)

(हेही वाचा- Baba Siddique यांच्या हत्येपूर्वी आरोपींचा रायगडच्या जंगलात सराव, झाडावर फायर केले होते ५-१० राऊंड)

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा विकास निधीमधून काढण्यात येणाऱ्या रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त ४४०० कोटी रुपये एवढी रक्कम काढली गेली होती. सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८५३.५८ कोटी एवढा निधी अंतर्गत कर्जाद्वारे उभारण्याची आवश्यकता भासणार असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे, चालू आर्थिक वर्षामध्ये तसेच पुढील वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात तूटीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Bmc)

चालू विकास कामांसाठी मंजूर केलेला खर्च आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या तुलनेत भांडवल खर्चातील वाढ, त्यामुळे या खर्चाचा भार सांभाळण्यासाठी महापालिकेला अंतर्गत कर्जाद्वारे निधी उभारण्याची गरज निर्माण झालेलीच आहे, शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणात निधीची असलेली आवश्यकता आणि  नागरिकांना वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यावश्यक दैनंदिन नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही वाढीव निधीची आवश्यकता असल्याने , भविष्यात महसूली उत्पन्न खुपच कमी होऊन पायाभूत सुविधांकरीता करण्यात  खर्चाकरता अंतर्गत कर्ज उभारणीवर अत्यंत मर्यादा येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेला अंतर्गत निधीतून कर्ज उभारण्याची मर्यादाच संपुष्टात येणार असल्याने बाहेरुन कर्ज उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे सुमारे  ५० हजार ते १ लाख कोटी रुपयांचे कर्ज बाहेरुन उभारण्याची गरज निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.  (Bmc)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.