Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष मारणार बाजी? RSS चा 288 जागांचा सर्व्हे आला समोर

312
Maharashtra Assembly Election : सलग ७ ते ८ वेळा निवडून येणाऱ्या दिग्गजांनाही यंदाची निवडणूक सोपी नाही

महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभुमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) (RSS) अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेतून महायुतीला 160 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: ‘हे’ ४५ मोठे नेते आज भरणार उमेदवारी अर्ज; पाहा संपूर्ण यादी)

आरएसएसच्या सर्वेक्षणानुसार महायुती 160 जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये भाजपाला (BJP) 90 ते 95 जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला 40 ते 50 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरएसएसचा या सर्वेक्षणाचा हा अंदाज खरा ठरतो की नाही हे पहावे लागेल. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या पाठोपाठ आता जळगावात सापडली रोकड!)

याबाबत आरएसएसच्या एका संबंधित व्यक्तीने सांगितले की, राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण समजून घेण्यासाठी संघ निवडणुकीपूर्वी गोपनीय पद्धतीने अंतर्गत सर्वेक्षण करतो. त्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे भाजपची निवडणूक रणनीती बनवली जाते आणि लोकसंख्या लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. दरम्यान, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आरएसएसने महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.