ICC Test Ranking : सर्फराझ आणि रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप; रिषभने विराटलाही टाकलं मागे 

91
ICC Test Ranking : सर्फराझ आणि रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप; रिषभने विराटलाही टाकलं मागे 
ICC Test Ranking : सर्फराझ आणि रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप; रिषभने विराटलाही टाकलं मागे 
  • ऋजुता लुकतुके 

बंगळुरू कसोटीतील कामगिरीचा फायदा सर्फराझ खान (Sarfaraz Khan) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत झाला आहे. दोघांनीही फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रिषभने तर विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. क्रमवारीत पहिल्या दोन जागा मात्र सध्या अढळ आहेत. जो रुट पहिल्या स्थानावर भक्कम आहे. त्याचे रेटिंग गुण काहीसे कमी झाले आहेत इतकंच.  (ICC Test Ranking)

(हेही वाचा- Cyclone Dana मुळे ५६ टीम्स हाय अलर्टवर; भुवनेश्वर-कोलकाता उड्डाणांवर १६ तासांसाठी बंदी, ५५२ ट्रेन रद्द)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरू इथं झालं. या सामन्यात सर्फराज आणि रिषभ यांनी दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर रिषभ पंत फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहांत पोहोचला आहे. त्याने विराटला मागे टाकलं आहे. तर आणखी एक भारतीय फलंदाज यशस्वी जयसवाल पहिल्या पाचांत आहे. (ICC Test Ranking)

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताच्या तीन खेळाडूंचा टॉप १० मध्ये समावेश आहे. यशस्वी जैस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे ७८० गुण आहेत. रिषभ पंतने तीन स्थानांची झेप घेतली आहे. तो विराट कोहलीच्याही पुढे गेला आहे. पंतचे ७४५ गुण आहेत. कोहली आठव्या स्थानावर आहे. या तिघांशिवाय टॉप १० मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. (ICC Test Ranking)

सर्फराजने न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत दमदार कामगिरी केली होती. त्याने दुसऱ्या डावात १५० धावा केल्या. याचा फायदा सर्फराजला क्रमवारीत झाला आहे. तो आता संयुक्त ५३ व्या स्थानावर पोहोचला आहेत. सर्फराजने कसोटी फलंदाजी क्रमवारीत ३१ स्थानांनी झेप घेतली आहे. त्याच्या कारकिर्दीतील हे मोठे यश आहे. (ICC Test Ranking)

कसोटीतील पुरुष अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अव्वल स्थानावर कायम आहे. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अक्षर पटेल सातव्या स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अश्विन गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. जडेजा संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.