Pune : साची साने हिचे लिबरल आर्ट्समध्ये सुयश

46
Pune : साची साने हिचे लिबरल आर्ट्समध्ये सुयश
Pune : साची साने हिचे लिबरल आर्ट्समध्ये सुयश

पुणे (Pune) येथील एमआयटी डब्ल्यूपीएची विद्यार्थिनी साची चंद्रशेखर साने हिने नुकतेच BA LIBERAL ARTS या अभ्यासक्रमात घवघवीत यश प्राप्त करीत सुवर्ण पदक मिळविले आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, साची हिने आपल्या या अभ्यासक्रमाच्या तीनही वर्षांत प्रथम क्रमांक मिळविण्यात सातत्य राखल्याने तिचे विशेष कौतुक केले जात आहे.

(हेही वाचा – ICC Test Ranking : सर्फराझ आणि रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप; रिषभने विराटलाही टाकलं नागे )

याशिवाय, साची हिने भरतनाट्यम् विशारद (प्रथम) वर्षात विशेष योग्यता प्राप्त केली आहे. BA LIBERAL ARTS हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नावाप्रमाणेच विषय निवडण्याची मुभा देतो. प्रथम वर्षी दर तिमाहीला वेगवेगळे विषय घेऊन त्यानंतर विद्यार्थी आपल्या आवडीचा एक ‘मेजर’ आणि एक ‘मायनर’ विषय निवडून पदवी ग्रहण करतात.

साचीने इंग्रजी हा विषय ‘मेजर’, तर ‘मायनर’साठी मीडिया स्टडीज हा विषय निवडला होता. प्रीती जोशी, आशीष कसबे, विशाखा पेठकर या गुरूजनांचे तिला या यशात विशेष साहाय्य आणि मार्गदर्शन लाभले असल्याचे ती प्रांजळपणे सांगते. नुकतेच लोणी काळभोर येथे झालेल्या पदवीप्रदान समारंभात साची हिला हे पदक प्रदान करण्यात आले.

साचीचा शिक्षण क्षेत्रातच काम करण्याचा मानस आहे. तिला ‘टीच फॉर इंडिया’ची (Teach for India) फेलोशिप मिळाली आहे. तसेच आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास कसा करून घ्यावा, आधुनिक इंटरनेट इत्यादी कसे वापरावे, याविषयीची तयारी करून घेण्याचा अनुभव तिला मिळाला असून त्यासाठी कॅलिडोस्कोप या स्वतःच्या संस्थेमार्फत तिने काम केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.