वायनाडहून कॉंग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडे एकूण 12 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच शिमला येथे 12 हजार चौरस फुटांचा फार्महाऊसही आहे. प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. यातून त्यांच्याकडे असलेली संपत्ती आणि उत्पन्नाचे माध्यम उघडकीस केले आहे.
प्रियंका गांधी वाड्रा यांनी जवळपास 12 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे सुमारे 66 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी काल बुधवारी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. प्रियंका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक होय. त्या मागील 35 वर्षांपासून राजकारणात असल्याचे दिसून येेत असले तरी त्या आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचाराचे काम बघत होत्या. आता त्या स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
(हेही वाचा – Pimpri Chinchwad मध्ये कोसळली पाण्याची मोठी टाकी; ५ कामगारांचा मृत्यू)
प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण 46.39 लाख रुपये होते. यात भाड्याचे उत्पन्न आणि बँकांचे व्याज आणि इतर गुंतवणूक यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांच्याजवळची सर्वात मौल्यवान मालमत्ता म्हणजे शिमल्याजवळ असलेला 12,000 चौरस फुटांचा फार्महाऊस. याची किंमत 5.64 कोटी रुपये आहे. याशिवाय 8 लाख रुपयांची होंडा सीआरव्ही देखील आहे. ही कार पत्नीने भेट दिली होती.
प्रियंका गांधी यांची जंगम मालमत्ता 4.24 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यात तीन बँक खात्यांमधील गुंतवणूक, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि 1.15 कोटी रुपयांचे 4,400 ग्रॅम सोने यांचा समावेश आहे. 7.74 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेमध्ये दिल्लीच्या मेहरौली येथील शेतजमीन आहे. ही वारसाहक्काने मिळाली. या शेतीची किंमत 2.10 कोटी रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे, आपल्यावर 15.75 लाख रुपयांचे कर्ज असून त्याची आपल्याला परतफेड करायची आहे, असे प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
(हेही वाचा – Pune Traffic Changes : दिवाळीनिमित्त पुणे शहराच्या वाहतुकीत बदल)
मात्र, रॉबर्ट वाड्रा यांची संपत्ती प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्याच्याकडे 53 लाख रुपयांची लँड क्रूझर, 1.5 लाख रुपयांची मिनी कूपर आणि 4.22 लाख रुपयांची सुझुकी मोटरसायकल आहे. जंगम मालमत्ता 37.9 कोटी रुपयाची आहे. त्यांच्याकडे 27.64 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याच्या व्यावसायिक हितसंबंधांमध्ये ब्लू ब्रीझ ट्रेडिंग एलएलपी, नॉर्थ इंडिया आयटी पार्क एलएलपी आणि स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी एलएलपी सारख्या मर्यादित दायित्व कंपन्यांमध्ये भागीदारी समाविष्ट आहे. स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीमध्ये 31.93 कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेसह एकूण 35.5 कोटी रुपये आहेत.
प्रतिज्ञापत्रानुसार, प्राप्तिकर विभागाने 28 मार्च 2023 रोजी वाड्रा यांच्या 2010 ते 2021 या कालावधीतील कर परताव्याच्या मुल्यांकनाची कार्यवाही सुरू केली. एकूण मागणी 80 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 2019-20 च्या करमापनासाठी सर्वात मोठी रक्कम 24.16 कोटी रुपये आहे. 2023-24 मध्ये रॉबर्ट वाड्रा यांचे घोषित उत्पन्न रुपये 15.09 लाख होते. मात्र, 2019-20 साठी त्यांनी 55.58 लाख रुपयांचे उत्पन्न दाखविले होते.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष मारणार बाजी? RSS चा 288 जागांचा सर्व्हे आला समोर)
प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, वन विभागाने सुद्धा नोटीस बजावली आहे. दिशाभूल करणारे ट्वीट केल्याच्या आरोपाखाली 2023 मध्ये मध्य प्रदेशात त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 आणि 469 अंतर्गत फसवणूक आणि खोटेपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2020 मध्ये उत्तर प्रदेशात आयपीसी कलम 188, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हाथरस घटनेच्या निषेध करताना त्यांनी नियमांचा भंग केला असा त्यांच्यावर आरोप आहे. प्रियंका आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोघांवरही कोविड-19 महामारी दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश आणि साथीच्या रोग कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community