Terrorist Attack: काश्मीरच्या बटगुंडमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा एका मजुरावर गोळीबार!

98
Terrorist Attack: काश्मीरच्या बटगुंडमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा एका मजुरावर गोळीबार!

गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी (Terrorist Attack) परराज्यातून येऊन येथे काम करणाऱ्यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. ओमर अब्दुल्ला सरकार स्थापन झाल्यानंतरच दहशतवाद्यांनी असे दोन हल्ले केले. 20 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा दहशतवाद्यांनी गंदरबलच्या गगनगीर भागात गैर-काश्मीरींवर गोळीबार केला. बोगद्यात काम करणाऱ्या सहा जणांचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू झाला. याशिवाय एका डॉक्टरचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश बाहेरचे होते. (Terrorist Attack)

(हेही वाचा-Cyclone Dana मुळे ५६ टीम्स हाय अलर्टवर; भुवनेश्वर-कोलकाता उड्डाणांवर १६ तासांसाठी बंदी, ५५२ ट्रेन रद्द)

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बटगुंड (Butgund) येथे गुरुवारी (24 ऑक्टो.) सकाळी दहशतवाद्यांनी आणखी एका मजुरावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात मजूर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कुमार (19) असे जखमीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. (Terrorist Attack)

(हेही वाचा-सणासुदीच्या काळात Digital Payment फसवणुकीपासून वाचण्यासाठी NPCI ने दिली महत्त्वाची माहिती)

दुसरीकडे, श्रीनगरमधील गनबाग परिसरात एका गैर-काश्मिरी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती एमडी जाहूद असून तो बंगालचा रहिवासी आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी 20 ऑक्टोबरला गंदरबल आणि 18 ऑक्टोबरला शोपियानमध्ये टार्गेट किलिंग केलं होतं. (Terrorist Attack)

(हेही वाचा-Abhijeet Bichukale विधानसभा निवडणूक लढणार; म्हणाले, ‘…तर मी सर्वांचे सोनं करणार’)

सातत्याने होत असलेले हल्ले पाहता आज (24 ऑक्टो.) राजभवनात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. ज्यामध्ये नॉर्थ विंग कमांडर, जम्मू-काश्मीर डीजीपी, कॉर्प्स कमांडर आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी उपस्थित असतील. (Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.