Raj Thackeray नावाचेच नाही तर मनाचेही राजे; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण

163
Raj Thackeray नावाचेच नाही तर मनाचेही राजे; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
Raj Thackeray नावाचेच नाही तर मनाचेही राजे; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण

शिवसेना उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचा सर्वाधिक आनंद हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झाला होता. त्यामुळेच त्यांनी त्यांच्याविरोधात आपला उमेदवार दिला नव्हता, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी गुरुवारी व्यक्त केली. तसेच राज ठाकरे हे नावाने नाही तर मनाने राजा आहे, अशी आठवण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितली.  (Raj Thackeray)

विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Elections) प्रक्रियेला सुरुवात झाली असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. यातच मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Aditya Thackeray) विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणूकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. यानंतर आता अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार आहेत. अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर आणि उबाठा गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघातील ही निवडणूक चुरशीची असून तिरंगी लढत होणार आहे. यातच बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

(हेही वाचा – Priyanka Gandhi यांच्याजवळ 12 कोटींची संपत्ती; 12000 फुटांचा फार्महाऊस)

मनसेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा

उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) यंदाची विधानसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मनसेने बहुतांश मतदारसंघात उमेदवार घोषित केलेत. मनसेने गुरुवारी आपल्या १३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तत्पूर्वी, मनसेने दुसऱ्या यादीत ४५ व पहिल्या यादीत ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.