इंडोनेशियामध्ये (Indonesia) मोठ्या संख्येने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना तेथील स्थानिक लोकांनी बोटीतून खालीही उतरू दिले नाही. लाकडी बोटीतून आलेले 140 रोहिंग्या मुसलमान इंडोनेशियाच्या उत्तरेकडील प्रांत आचेच्या किनाऱ्यापासून साधारणपणे 1 मैल (0.60 किलोमीटर) दूर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यात अधिकांश महिला आणि मुलांचा समावेश होता. त्यांना इंडोनेशियाच्या हद्दीत प्रवेश देण्यास स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. बंदरावर एका मोठ्या बॅनरवर लिहिले होते की, “या प्रदेशात रोहिंग्या निर्वासितांच्या (Rohingya Muslims) आगमनाला दक्षिण आचे रीजेंसीच्या लोकांचा विरोध आहे.”
(हेही वाचा – Jemima Rodrigues : महिला क्रिकेटपटू जेमायमाह रॉड्रिगेस वडिलांमुळे अडचणीत; या क्लबने रद्द केलं सदस्यत्व)
दक्षिण आचेमध्ये मच्छीमार समुदायाचे प्रमुख महम्मद जबल यांनी म्हटले आहे, “आमच्या मच्छिमार समुदायने त्यांना येथे उतरू दिले नाही, कारण इतर ठिकाणी जे काही घडले ते येथे होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ते जेथे गेले, तेथे स्थानिकांमध्ये अशांतता निर्माण झाली.” ही बोट बांगलादेशातून निघाली, तेव्हा तिच्यावर 216 लोक होते. यांपैकी 50 लोक इंडोनेशियातील रियाउ प्रांतात उतरले होते.
बांगलादेशातील (Bangladesh) कॉक्स बाजारातून दक्षिण आचे जिल्ह्यातील लाबुहान हाजीच्या किनाऱ्यापर्यंत जवळपास दोन आठवड्यांच्या प्रवासादरम्यान तीन रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी 11 रोहिंग्यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. रोहिंग्या मुस्लिमांचा (Rohingya Muslims) हा समूह 9 ऑक्टोबरला कॉक्स बाजारातून रवाना झाला होता, अशी माहिती आचे पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community