गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात सादरा गावात एका अल्पवयीन मुस्लिम तरुणाने भगवान श्रीराम आणि माता सीतेबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. या घटनेच्या विरोधात शेकडो स्थानिक रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिस ठाण्यापर्यत मोर्चा ही काढला. त्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या घटनेनंतर गावात पूर्ण बंदची घोषणा देण्यात आली आहे. (Prabhu Shree Ram)
बजरंग दलाचे प्रमुख गणपत सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ही घटना दि. २२ ऑक्टोबर रोजी झाली. इथे सादरा गावातील १६ वर्षीय मुस्लिम तरुणाने इस्ट्राग्रामवर भगवाल राम आणि माता सीता यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान पोस्ट केले. या पोस्टतचे स्क्रीनशॉर्ट गावात व्हायरल झाले. ज्यामुळे हिंदू समाजात संतापाची लाट पसरली. त्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर पोलिस ठाण्यात कारवाई करण्यासाठी तक्रार ही दाखल करण्यात आली. (Prabhu Shree Ram)
घटनेनंतर गावातील अंदाजे २०० ते ३०० लोक चिलोडा पोलिस स्टेशनला पोहचले. त्यावेळी स्थानिकांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी पोलिसांकडे स्क्रीनशॉट्स आणि इतर पुरावे सोपवले. स्थानिक रहिवाशी राजेश पटेल म्हणाले की, या घटनेमुळे धार्मिक भावनांना ठेच पोहचली आहे. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कुणीही अशी हरकत करणार नाही. याप्रकरणी चिलोडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक, पीआय परमार म्हणाले की, आम्ही प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे ही परमार म्हणाले. (Prabhu Shree Ram)
आरोपीच्या आई-वडीलांनी मागितली माफी
दरम्याम घटनेनंतर आरोपीच्या आई-वडीलांनी सरपंचांची आणि हिंदू संघटनांची माफी मागितली. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अल्पवयीन आहे, त्याने अजाणतेपणी हा प्रकार केला. सरपंच रमेश चौहान म्हणाले की, अल्पवयीन मुस्लिम तरुणाच्या आई-वडीलांनी माफी मागितली असून अशी चुक परत होणार नाही, असे आश्वासन दिला आहे. (Prabhu Shree Ram)
Join Our WhatsApp Community