- प्रतिनिधी
वरळी विधानसभेचे शिवसेना उबाठाचे उमेदवार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उमेदवारी नामांकन दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. लोअर परेल येथील शिवसेना शाखा क्रमांक १९८ येथून भव्य मिरवणुकीत स्थानिक मतदार राजा ही सहभागी होता. यावेळी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देताना आमची निशाणी मशाल हेचं सांगत होते.
(हेही वाचा – Raj Thackeray नावाचेच नाही तर मनाचेही राजे; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण)
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उमेदवारी अर्ज दाखल करताना उबाठा शिवसैनिकांकडून मोठी जय्यत तयारी केली होती. यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेना उबाठाकडून मोठं शक्तीप्रदर्शन वाजत, गाजत जयघोशात करण्यात आलं. यावेळी उबाठा नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदीजी, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी उपमहापौर शुभांगी वरळीकर आदी यावेळी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community