राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधक ही विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर करत आहेत. भाजपा, शिवसेना, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहेत. दरम्यान प्रचारसभांना सुद्धा सुरुवात झाली आहे. यामुळेच महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सलग आठ दिवस सभा घेणार आहेत. (Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांचा ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान सभांचा धडाका महाराष्ट्रात असणार आहे. या सर्व सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार आहेत. पंतप्रधान १४ नोव्हेंबरनंतर परदेश दौऱ्यावर असल्यानं सभांना कमी कालावधी मिळणार आहे. त्यानुसार सभांचे काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे.
(हेही वाचा –Raj Thackeray नावाचेच नाही तर मनाचेही राजे; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण )
असे असेल सभांचे नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Sabha) यांचे मुंबईत किमान दोन सभा, पुण्यात एक सभा तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांसाठी देखील पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही मोदींच्या सभा होऊ शकतात. मात्र एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवारांसाठी देखील सभा घेतल्या जातील. मात्र अद्याप पंतप्रधान मोदी यांच्या सभांचे ठिकाणं निश्चित झालेले नाहीत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community