Sanju Samson : संजू सॅमसन टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार होता, पण…

Sanju Samson : संजू सॅमसनने अलीकडेच टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळता न आल्याची खंत व्यक्त केली आहे. 

102
Sanju Samson : संजू सॅमसन टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार होता, पण...
  • ऋजुता लुकतुके

भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) नुकतेच टी-२० मधील आपलं पहिलं शतक साजरं केलं आहे. त्यानंतर एका कार्यक्रमात मनातील एक सलही बोलून दाखवली. त्याला जून २०२४ मध्ये टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याची संधी चालून आली होती. पण, सामन्या आधी १० मिनिटं कर्णधार रोहित शर्माने त्याची निवड करता येत नसल्याचं त्याला सांगितलं. पुढे भारताने तो ऐतिहासिक सामना जिंकला हे सगळ्यांना आठवत असेलच. तो सामना खेळता न आल्याची खंच अजूनही संजूला भेडसावते.

विमल कुमारच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत संजू (Sanju Samson) म्हणाला की, मी यामुळे निराश झालो, पण रोहित शर्माच्या समजावण्याच्या पद्धतीमुळे मी त्याच्याशी सहमत झालो आणि माझा त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. सॅमसन सध्या रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळत आहे.

(हेही वाचा – Prabhu Shree Ram यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन मुस्लिम मुलाला अटक)

नुकतेच टी२० मध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या संजूने (Sanju Samson) सांगितले की, ‘मला फायनलच्या दिवशी सकाळी बार्बाडोसमध्ये खेळण्याची संधी मिळणार होती. मला तयार राहण्यास सांगण्यात आले. मी तयार होतो पण नाणेफेकीच्या आधी मला सांगण्यात आले की आम्ही कोणताही बदल न करता जाऊ. यामुळे मी निराश झालो. वॉर्म अप चालू असताना रोहित भाई आले आणि मला बाजूला घेऊन गेले आणि मी असा निर्णय का घेत आहे हे समजावून सांगू लागले.

संजू पुढे म्हणाला, त्याने मला समजावून सांगितले आणि अगदी स्वाभाविकपणे म्हणाला, ‘संजू, तुला समजले का?’, मी म्हणालो – मला अगदी समजले. चला सामना खेळू, मग जिंकल्यावर बोलू. यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, नाही तू मला मनातल्या मनात खूप काही बोलत आहेस. मला असे वाटते की तू आनंदी नाहीस. तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. संजू म्हणाला, ‘नाही, नाही रोहित भाई, असं काही नाही.’ यानंतर आमच्यात पुन्हा संभाषण सुरू झाले. सॅमसन (Sanju Samson) म्हणाला की, रोहित शर्मासारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना खेळू शकलो नाही याची एकच खंत आहे. पण त्याला आनंद आहे की रोहितने इतर खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आणि सामन्यापूर्वी त्याला समजावून सांगितले, ही गोष्ट त्याच्या मनाला भिडली. त्याने रोहितला सांगितले की, भारतासाठी विश्वचषक खेळण्याचे लहानपणापासून माझे स्वप्न होते. मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.