IPL Mega Auction : आयपीएलचा मेगा लिलाव सौदी अरेबियात?

IPL Mega Auction : रियाधमध्ये हा लिलाव भरवण्याची तयारीही सुरू झाली असल्याचं समजतंय. 

91
IPL Mega Auction : आयपीएलच्या मेगा लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; पंत, राहुलची मूळ किंमत २ कोटी रु
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव पुढील महिन्यात २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये होऊ शकतो. क्रिकबझच्या एका बातमीनुसार, बीसीसीआयने अनेक शहरांचा विचार केल्यानंतर सौदी अरेबियाची राजधानी रियाध या शर्यतीत आघाडीवर असल्याचं समजतंय. बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु तारखा आणि ठिकाणही निश्चित झाली आहेत. (IPL Mega Auction)

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेचा पहिला सामना २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान पर्थ इथं होणार आहे. हा सामना सुरू असतानाच लिलावही होईल अशी तयारी सुरू आहे. लिलावाचंही थेट प्रसारण होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील सामना संपल्यानंतर लिलाव सुरू करण्याचं बीसीसीआयचं नियोजन आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – Terrorist Attack: काश्मीरच्या बटगुंडमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा एका मजुरावर गोळीबार!)

क्रिकबझच्या बातमीनुसार, बीसीसीआयचे काही अधिकारी यापूर्वीच सौदी अरेबियाला गेले आहेत. तर या आठवड्यात बीसीसीआयचं आणखी एक पथक सौदी अरेबियाला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने दुबई, सिंगापूर आणि लंडनसारख्या इतर काही ठिकाणांचाही विचार केला होता, परंतु अंतिम निर्णय घेताना रियाधला झुकतं माप मिळालं आहे. दोन दिवस हा मेगा लिलाव पार पडणार आहे. (IPL Mega Auction)

आयपीएल २०२५ मधील संघांसाठी खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संघांना त्यांच्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे जमा करायची आहे. क्रिकबझच्या अहवालात पुढे म्हटले आहे की जर संघांना पर्याय दिला गेला तर ते भारतात लिलाव आयोजित करण्यास प्राधान्य देतील, परंतु सध्या भारतात लिलाव आयोजित करण्याचा विचार बीसीसीआयने सोडून दिला आहे. (IPL Mega Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.