Ajit Pawar यांना मोठा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार

128
Ajit Pawar यांना मोठा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार
  • प्रतिनिधी 

राज्यात निवडणूकीचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. एकूणच निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. मात्र, अजित पवार यांना प्रत्येक ठिकाणी ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’ असा मजकूर लिहावा लागणार आहे.

(हेही वाचा – Terrorist Attack: काश्मीरच्या बटगुंडमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा एका मजुरावर गोळीबार!)

त्यासोबतच अजित पवार (Ajit Pawar) यांना शरद पवार यांनी दाखल केलेल्या अर्जावर आणि कोर्टाच्या निर्देशावर प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात ६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला.

(हेही वाचा – Prabhu Shree Ram यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन मुस्लिम मुलाला अटक)

यावेळी बोलताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, घड्याळ हे चिन्ह दोघांपैकी कोणालाही मिळू नये अशी आमची मागणी होती. मात्र, तुम्ही १९ मार्च रोजी हे चिन्ह बहाल करताना काही अटी घातल्या होत्या. मात्र, त्या अटींचे पालन अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून झालेलं नाही याकडे सिंघवी यांनी लक्ष वेधले. जे चिन्ह कोर्टाच्या विचाराधीन आहे तेव्हा त्याचा फायदा दोघांपैकी एकाला व्हायला नको, हे चिन्ह पक्ष फुटीपूर्वीचे असल्याचे अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.