बुलेट ट्रेन प्रकल्पाला Make in India ची साथ

85
बुलेट ट्रेन प्रकल्पाला Make in India ची साथ
बुलेट ट्रेन प्रकल्पाला Make in India ची साथ

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून या प्रकल्पात मेक इन इंडियाला चालना देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी गुजरात येथील वडोदरा विभागात असणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ स्टील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यातच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दि. २२ ऑक्टोबरला आणखीन एक स्टील पूल यशस्वीरित्या लॉन्च केला आहे. सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे सर्वोच्च मानक राखत हा प्रकल्प काटेकोरपणे राबविला जात आहे. एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी नियोजित २८ स्टील पुलांपैकी हा पाचवा स्टील पूल आहे. (Make in India)

( हेही वाचा : निवडणुकीच्या तोंडावर Ajit Pawar यांना मोठा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार

दरम्यान एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेच्या बाजवा – छायापुरी कॉर्ड लाइनवर हा ६० मीटर लांबीचा मेक इन इंडिया पूल उभारण्यात आला आहे. पूल १२.५ मीटर उंच आणि १४.७ मीटर रुंद असून ६४५ मेट्रिक टनाचा पोलादी पूल आहे. विशेष म्हणजे हा पूल गुजरातमधील भचाऊ येथील कार्यशाळेत तयार करण्यात आला आहे. त्यानंतर पूल लॉन्च करण्यासाठी साईटवर आणण्यात आला. या पुलाचे आयुष्यमान १०० वर्ष असून त्या पद्धतीने हा पूल डिझाईन करण्यात आला आहे. जपानी कौशल्याचा वापर करून भारत ‘मेक इन इंडिया’ (Make in India) उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे यश आहे. (Make in India)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.