Zomato Platform Fee : झोमॅटोवरून अन्नपदार्थ मागवणं होणार महाग, किती महाग जाणून घ्या

Zomato Platform Fee : झोमॅटोने आपलं प्लॅटफॉर्म शुल्क ३ रुपयांनी वाढवलं आहे.

112
Zomato Platform Fee : झोमॅटोवरून अन्नपदार्थ मागवणं होणार महाग, किती महाग जाणून घ्या
  • ऋजुता लुकतुके

घरपोच अन्न पदार्थ पोहोचवणारी झोमॅटो सेवा वापरण्यासाठी आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, झोमॅटोने आपलं प्लॅटफॉर्म शुल्क ७ रुपयांवरून १० रुपयांवर आणला आहे. कंपनी चालवण्यासाठी हे पैसे आम्हाला उपयोगी पडतील, अस कंपनीचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी म्हटलं आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये, झोमॅटोने नफ्याचं प्रमाण वाढवण्यासाठी तसंच ब्रेक-इव्हनसाठी प्लॅटफॉर्म शुल्क आकारायला सुरुवात केली होती. सुरुवातीला हे शुल्क २ रुपये होतं. नंतर त्यांनी ते ४ रुपये आणि शेवटी ७ रुपये केलं होतं. आता त्यात आणखी ३ रुपयांची वाढ होऊन ते १० रुपयांवर आलं आहे. (Zomato Platform Fee)

(हेही वाचा – K L Rahul : लखनौ फ्रँचाईजी के एल राहुलला कायम ठेवण्याची शक्यता कमीच, नवीन कर्णधाराच्या शोधात)

प्रत्येक फूड ऑर्डरवर प्लॅटफॉर्म शुल्क हे अतिरिक्त शुल्क लागू होते. जीएसटी, रेस्टॉरंट शुल्क आणि वितरण शुल्क यांच्यावर हे अतिरिक्त शुल्क लागू होतं. सध्या झोमॅटोवर दर दिवशी २० ते २५ लाख ऑर्डरचं बुकिंग होतं.

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा जुलै-सप्टेंबर तिमाहीत नफा वार्षिक आधारावर ३८८ % वाढून रु. १७६ कोटी झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ३६ कोटी रुपये होता. (Zomato Platform Fee)

(हेही वाचा – Pune : साची साने हिचे लिबरल आर्ट्समध्ये सुयश)

झोमॅटोने मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी आर्थिक वर्ष २०२४ – २५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ६८.५० % ने वाढून ४,७९९ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल २,८४८ कोटी रुपये होता.

कंपन्यांचे निकाल दोन भागांत येतात – स्वतंत्र आणि एकत्रित. स्टँडअलोन अहवाल केवळ एका युनिटची आर्थिक कामगिरी दर्शवतात, तर एकत्रित आर्थिक अहवाल संपूर्ण कंपनीचा अहवाल देतात. येथे, झोमॅटोच्या २८ उप कंपन्या, १ ट्रस्ट आणि १ सहयोगी कंपनी ब्लिंकिटसह आहे. दीपिंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांनी मिळून त्यांची फूड डिरेक्टरी वेबसाइट २००८ मध्ये फूडबे नावाने सुरू केली. २०१० मध्ये कंपनीचं नाव बदलून झोमॅटो करण्यात आलं. (Zomato Platform Fee)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.