Maharashtra Assembly Election : शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसवर केली कुरघोडी

91
Maharashtra Assembly Election : शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसवर केली कुरघोडी
  • प्रतिनिधी

महाविकास आघाडीतील ठाकरे गटातर्फे ६५ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली होती. ही यादी जाहीर करून शिवसेना ठाकरे गटाने कुरघोडी केली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानतंर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी या यादीत थोडासा बदल होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी दैनिक सामनामध्ये फोटोसह प्रसिद्ध केलेल्या यादीत एक नाव वगळण्यात आले असून ६४ उमेदवारांची नावे आहेत. (Maharashtra Assembly Election)

वगण्यात आलेले हे नाव रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांचे आहे. उस्मानाबाद (धाराशिव) मधील परांडा विधानसभा मतदारसंघातून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल मोटे यांचे नाव चर्चेत आहेत. ते सलग तीन वेळा परांडा विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. अशा प्रकारचीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून जाहीर उमेदवार मागे घेण्याची परिस्थिती ठाकरे गटावर येणार आहे. त्या ठिकाणी गणपत देशमुख यांचे नातू शेकापामधून उभे राहणार असल्याचे बोलले जाते. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Ajit Pawar यांना मोठा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार)

रामटेक विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असताना चर्चे आधीच ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेस पक्ष हा दिल्लीतून यादी प्रसिद्ध करत असल्यामुळे विलंब झाल्याचा फायदा घेत ठाकरे गटाने कुरघोडी करत आधीच उमेदवार जाहीर केला त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. (Maharashtra Assembly Election)

महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला आहे. तर मित्रपक्षाला १८ जागा देण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत आदित्य ठाकरे, केदार दिघे यांच्याबरोबरच नाशिक मध्यचे माजी आमदार वसंत गीते, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर, निफाड – अनिल कदम, मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे, नांदगाव – गणेश धात्रक, यांच्या नावाचा समावेश आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – उबाठा युवासेना अध्यक्ष Aditya Thackeray यांचा उमेदवारी नामांकन अर्ज दाखल)

अगोदरच ठाकरे गटाने एबी फॉर्म दिले

महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याअगोदर ठाकरे गटाने एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकृतपणे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर झाल्यानतंर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी या यादीत थोडासा बदल होणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीने ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला आहे. तर मित्रपक्षाला १८ जागा देण्यात येणार आहे. (Maharashtra Assembly Election)

महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनी आजचा मुहूर्त साधत उमेदवारी दाखल केली देखील. त्यामुळे चर्चेत न जर एखादी विधानसभा क्षेत्र मित्र पक्षाला देण्याची वेळ आली तर मात्र मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी बंडखोरी होऊ शकते. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.