नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकामांवरील कारवाईचे CIDCO चे आश्वासन!

74
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकामांवरील कारवाईचे CIDCO चे आश्वासन!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा’च्या (CIDCO) जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे सर्व अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गुरुवारी (२४ ऑक्टोबर) पुन्हा एकदा सिडको (CIDCO) प्रशासनाकडे केली. त्यावर अनधिकृत बांधकामावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले.

(हेही वाचा – Crime : खबरी समजून तिघांना विवस्त्र करून दिला विजेचा शॉक; ३ जणांना अटक)

समितीने ‘सिडको’चे (CIDCO) मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक बळवंत पाठक, समितीचे महेश लाड आणि पत्रकार विजय भोर उपस्थित होते. वर्ष २०१२ मध्ये चार दगडांना पांढरे आणि हिरवे रंग देण्यात आले होते. आज वर्ष २०२४ मध्ये ही एक एकर मालमत्ता झाली आहे. झाडाखाली चार पांढर्‍या रंगाच्या दगडांनी कंपाऊंड, कारंजे, घुमट, पाण्याच्या टाक्या, आऊटहाऊस, गेस्ट हाऊस आणि पार्किंग असलेला मोठा दर्गा बनला आहे. हे खूपच गंभीर आहे.

(हेही वाचा – उबाठा युवासेना अध्यक्ष Aditya Thackeray यांचा उमेदवारी नामांकन अर्ज दाखल)

हे बेकायदेशीर बांधकाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असल्याने राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात अनेक संघटनांनी पोलीस आणि सिडकोला पत्र लिहून बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात तातडीने कारवाईची मागणी केली होती. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार सिडकोने बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी आधीच नोटीस बजावली होती; पण तरीही कोणत्याही अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष कारवाई केलेली नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत दर्गे, मजारी, बांधकामे हटवण्याचा विषय आला की, प्रशासन कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत शांत बसते; मात्र अन्य बांधकामांवर लगेच कारवाई करते. अन्य बांधकामाप्रमाणेच हे बांधकाम हटवणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीने सिडको प्रशासनाच्या या आश्वासनाचे स्वागत केले असून लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जेणेकरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात सुरक्षा सुनिश्चित होईल. (CIDCO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.