वरळीतून Aditya Thackeray यांचा परतीचा प्रवास सुरु; Sheetal Mhatre यांची टीका

वरळीमुळे आदित्यचा विकास झाला असा टोला शीतल म्हात्रे यांनी लगावला

67
वरळीतून Aditya Thackeray यांचा परतीचा प्रवास सुरु; Sheetal Mhatre यांची टीका
  • प्रतिनिधी

वरळीला विकासापासून वंचित ठेवलेल्या आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु झाल्याची खरमरीत टीका शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी गुरुवारी (२४ ऑक्टोबर) केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वरळीमुळे आदित्यचा विकास झाला असा टोला म्हात्रे यांनी यावेळी लगावला.

लोकसभा निवडणुकीत आव्हान देणारे आज उंदरासारखे वरळीच्या बिळात जाऊन लपले, अशी टीका त्यांनी केली. लोकसभेत फेक नरेटिव्हच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांची मते मिळवली. मात्र उबाठाने पहिल्या यादीत किती अल्पसंख्यांकांना उमेदवारी दिली ते पाहायला हवे. निवडणुकीत वापरा आणि फेकून द्या असे उबाठाचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला उबाठाने नाशिकमधून उमेदवारी दिली.

(हेही वाचा – Ncp Sharad Pawar गटाची पहिली यादी जाहीर, बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई होणार)

त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरणार आहेत. मात्र उबाठा गटात आदित्य ठाकरेंनी पहिला अर्ज भरला. स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे हे कुठून निवडणूक लढवणार आहेत की प्रत्येकवेळी मागच्या दाराने येणार अशी खरमरीत टीका त्यांनी केली. लोकांच्या मनामधला मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांच्यामध्ये उतरावे लागते. लोकांशी फेस टू फेस बोलावे लागते. फेसबुक लाईव्ह करुन कोणी मुख्यमंत्री होत नाही. एक दिवस जनताच तुमच्या तोडांला फेस आणेल, अशी टीका त्यांनी केली. (Sheetal Mhatre)

उबाठाने १४६ जागांसाठी भाजपाबरोबर युती तोडली आज त्यांना ८५ जाग मिळत आहेत. १९९५ मध्ये शिवसेनेला १६९ जागा, १९९९ मध्ये १६१ जागा, २००४ मध्ये १६३ जागा, २००९ मध्ये १६० जागा आणि २०१४ युती तोडल्याने शिवसेना २८६ जागांवर निवडणूक लढली होती. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या. आता केवळ ८५ जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीने उबाठाला खरी जागा दाखवली, अशी टीका म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केली.

(हेही वाचा – Crime : खबरी समजून तिघांना विवस्त्र करून दिला विजेचा शॉक; ३ जणांना अटक)

८५, ८५ आणि ८५ म्हणजे २७० असे नवे गणित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सांगितले, असा टोला म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी लगावला. त्या पुढे म्हणाल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसचा गेम झाला. सगळ्यात जास्त आमदार असूनही त्यांना केवळ ८५ जागा मिळाल्या. दोन मांजरांच्या भांडणात बोका लोण्याचा गोळा मटकावतो. हा बोका कोण आहे हे सगळ्यांना माहित आहेत, असा टोला म्हात्रे यांनी लगावला. लोकसभेत शिवसेनेत ज्यांना तिकिट मिळाली नाहीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर मानाची पदं दिली. शिवसेनेत कुठेही बंडखोरी न होता नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.