Worli Assembly Constituency : काहीही झाले तरीही वरळीची जागा मनसे लढवणारच!

108
Worli Assembly Constituency : काहीही झाले तरीही वरळीची जागा मनसे लढवणारच!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने उबाठा शिवसेनेकडून या मतदारसंघातून उमेदवारांना शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, माहीममधून उबाठाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास वरळीत उबाठा शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्यासमोरुन मनसेच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, माहीमबाबत जो निर्णय होईल, तो वरळीला लागू नसेल. वरळीतील जागा मनसे लढवणारच असून माहीममधून उबाठा शिवसेनेने अर्ज मागे घेतला म्हणून वरळीतून मनसेचा उमेदवार माघार घेणार नसून वरळीत मोठ्या ताकदीनेच लढत देण्याचा निर्धार मनसेने केल्याचे दिसून येत आहे. (Worli Assembly Constituency)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : तब्बल १८ वर्षांनंतर श्रद्धा जाधव यांचे स्वप्न साकार, कोळंबकर यांना भिडणार)

वरळी विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेनेचे आमदार आणि पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना शह देण्यासाठी मनसेने मागील दीड वर्षांपासून फिल्डिंग लावली असून आदित्य विरोधातील वातावरणाचा फायदा मनसेने उचलणार आहे. त्यामुळे मनसेने या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोपवली होती. त्यानंतर संदीप देशपांडे यांच्या सूचनेनुसार विभाग अध्यक्ष बदलून ही जबाबदारी माजी नगरसेवक संतोष धुरी याच्यावर सोपवली. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी मागील दीड वर्षांत वरळी विधानसभेची चांगली बांधणी केली आहे. वरळीतील प्रत्येक चाळ, इमारत आणि वसाहतींना भेटी देत वरळीतील नागरिकांशी संवादही साधला आहे. समाज माध्यमावरही आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यावरून पोस्ट व्हायरल करून कोण जिंकणार यांच्या कमेंट्स बॉक्समध्येही दोघांना समसमानच प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यासाठी येथील वातावरण अनुकूल असल्याचे दिसून ये आहे. (Worli Assembly Constituency)

(हेही वाचा – बंडखोरांवर Amit Shah यांचं विशेष लक्ष; महायुतीच्या नेत्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना)

त्यामुळे वरळीतील आदित्य विरोधातील वातावरणामुळे मनसेची निवडणूक लढवण्याची इच्छा अधिक प्रकट होऊ लागली आहे. त्यातच आदित्य ठाकरे स्वत: आमदार आणि सचिन अहिर व सुनील अहिर हे दोन आमदार सोबत असूनही वरळीचा विकास न झाल्याने वरळीकर अधिक नाराज असल्याने याचाच फायदा मनसेला उचलायचा आहे. त्यामुळे माहीम विधानसभेतून अमित ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर उबाठा शिवसेनेकडून येथून उमेदवारी अर्ज मागे घेत ठाकरेंना मदत करण्याचा प्रयत्न केला गेला तर वरळीतही याचे परिणाम दिसतील असे बोलले जात आहे. दरम्यान,माहीम विधानसभेचा नियम हा वरळीसाठी नसून वरळीचा जागा मनसेकडून लढण्यावर पक्षातील नेते ठाम आहेत. त्यामुळे माहीम जो निर्णय होईल तो होईल, पण वरळीसाठी तो लागू नसेल असे मनसेकडून सांगण्यात येत असल्याने उबाठा शिवसेना नक्की काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Worli Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.