Maharashtra Assembly election 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; नाना पटोलेंसह ‘हे’ ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात

170
Maharashtra Assembly election 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; नाना पटोलेंसह ‘हे’ ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra Assembly election 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; नाना पटोलेंसह ‘हे’ ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी कॉंग्रेस पक्षाची (Congress Party) पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.   (Maharashtra Assembly election 2024)     

काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असून, आपले ४८ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांसारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. (Maharashtra Assembly election 2024)

काँग्रेस पक्षाची पहिली यादी

1.अक्कलकुवा – ॲड. के.सी. पडवी
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी
4.नवापूर –  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण –  कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे – प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम –  प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती –  बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम –  विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली –  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी –  विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर –  सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव –  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री –  विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

(हेही वाचा – वरळीतून Aditya Thackeray यांचा परतीचा प्रवास सुरु; Sheetal Mhatre यांची टीका)

दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उबाठाकडून ६५ तर शरदचंद्र पवार गटाकडून ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra Assembly election 2024)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.