- खास प्रतिनिधी
महाविकास आघाडीत काँग्रेस (Congress) पक्षाला जागावाटपात अडकवून शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार राज्यभर पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत, अशी चर्चा काँग्रेस गोटात होत आहे.
गेले महिनाभर शरद पवार आणि उद्धव ठाकरे (एंजिओप्लास्टी होईपर्यंत) राज्यभर दौरे करत फिरत होते. पवार आजही विविध जिल्ह्यांना भेटी देऊन उमेदवार निश्चित करत आहेत तर काँग्रेसचे (Congress) सगळे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण जागावाटपाच्या बैठकीत मग्न आहेत.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त)
मुख्यमंत्री पदासाठी ८५
बुधवारी २३ ऑक्टोबर २०२४ रोजी ८५-८५-८५ हा जागावाटपाचा फॉर्म्युला काँग्रेसने (Congress) मान्य केला. यावरूनही काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. नाना पटोले यांनी ८५-८५-८५ फॉर्म्युला अमान्य केला मात्र तोच बाळासाहेब थोरात यांनी मान्य केल्याने पक्षांतर्गत धुसपुस वाढली आहे.
नाना पटोले यांच्याऐवजी चर्चेसाठी थोरात यांना जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या ८५-८५-८५ या फॉर्म्युलाला मान्यता दिली. पवार यांनी काँग्रेसला (Congress) मुख्यमंत्री पद देण्याच्या बदल्यात ८५ जागांचा फॉर्म्युला काँग्रेसकडून मान्य करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसवर केली कुरघोडी)
काँग्रेसची तुलना उबाठा-राष्ट्रवादीशी
काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांमध्ये पटोले आणि थोरात यांच्याविरुद्ध वातावरण तयार होत असून त्यांनी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठासारख्या प्रादेशिक पक्षांच्या रांगेत आणून ठेवल्याची भावना काँग्रेस (Congress) पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. मुळात काँग्रेसची तुलना उबाठा आणि राष्ट्रवादीशी होऊ शकत नाही, कारण सध्या काँग्रेस राज्यात सगळ्यात मोठा पक्ष असूनही प्रादेशिक पक्षांशी बरोबरी करणे योग्य नाही, अशी चर्चा काँग्रेस गोटात होत आहे.
१२५ वरून ८५ वर
काँग्रेसने सुरूवातीला १२५ जागांची मागणी केली होती. त्यावर चर्चाही झाली. मात्र चर्चा पुढे सरकली तशी काँग्रेसची किंमत कमी होत गेली. काँग्रेसच्या (Congress) जागा १२५ वरून ११० आणि अखेर ८५ वर रखडली आणि त्यावर थोरात-पटोले यांनी मान्यता दिली, यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community