मुंबई गुन्हे शाखेने बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणात बुधवारी रात्री उशिरा पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तीन जणांपैकी अटक करण्यात आलेला आरोपी रुपेश मोहोळ हा पुण्यातील गुंड शरद मोहोळचा चाहता होता, त्याने स्वतःच्या मोबाईल डीपीवर शरद मोहोळ याचे फोटो ठेवले होते अशी माहिती समोर आली आहे. रुपेशला पुण्यात शरद मोहोळ सारखा गुंड बनायचे होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेने बुधवारी पुण्यातुन रुपेश राजेंद्र मोहोळ (२२), करण राहुल साळवे (१९ ) आणि शिवम अरविंद कोहाड (२०) या तिघांना बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात अटक आरोपीची संख्या १४ झाली आहे. अटक करण्यात आलेल्या या तिघांना बाबा सिद्दीकीच्या हत्येची ५० लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, परंतु या तिघांनी देखील पुढचे परिणाम लक्षात घेऊन हत्येची सुपारी घेण्यास नकार दिला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. (Baba Siddiqui)
(हेही वाचा- Congress ची तुलना शिवसेना उबाठा आणि पवारांच्या राष्ट्रवादीशी; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप)
मुंबईतील वांद्रे पूर्व येथे १२ऑक्टोबर रोजी माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा करीत असून या गुन्ह्यात गुन्हे शाखेने दोन हल्लेखोराना घटनास्थळावर अटक केली,तर इतरांना कर्जत,पनवेल,डोंबिवली अंबरनाथ, पुणे,हरियाणा, उत्तर प्रदेशातुन अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात सर्वात प्रथम लॉरेन्स बिष्णोईचे नाव पुढे आले, त्या नंतर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोईचे नाव समोर आले, परंतु या हत्येची सुपारी पुण्यातील शुभम उर्फ शुभु लोणकर यांने घेतली होती असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. परंतु या हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यातच असून गुन्हे शाखेकडून राजकीय वाद, एसआरए प्रकल्प आणि सलमान खानच्या जवळीक असल्याकारणाने लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.मात्र तपास पथक अद्याप हत्येच्या मुख्य कारणापर्यत पोहचू शकलेले नाही. आम्ही सर्व बाजूनी तपास करीत असल्याचे पोलिसकडून सांगण्यात येत असले तरी ही हत्या एसआरए प्रकल्प वादातूनच झाल्याची चर्चा सुरू आहे. (Baba Siddiqui)
गुन्हे शाखेने या गुन्ह्यात मागील १२ दिवसापासून एकूण चौदा जणांना अटक केली असून बुधवारी रुपेश राजेंद्र मोहोळ (२२), करण राहुल साळवे (१९) आणि शिवम अरविंद कोहाड (२०) या तिघांना अटक करण्यात आली, हे तिघे पुण्यातील कोथरूड आणि उत्तम नगर परिसरात राहणारे आहेत, या तिघांचे शिक्षण बारावी पर्यत झाले आहे. रुपेश मोहळ याचे पुण्यात भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्याच्यावर पुण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. रुपेश हा पुण्यात मारला गेलेला गुंड शरद मोहाळ याचा चाहता होता, त्याला शरद मोहळ सारखे बनायचे होते, त्याच्या मोबाईल फोनच्या डीपीला त्याने शरद मोहळ याचा फोटो लावलेला पोलिसांना आढळून आला.इतर दोघे रुपेश च्या सांगण्यावरून काम करायचे.
बुधवारी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या या तिघांना पहिल्या टीमसोबत जोडले गेल्याचे उघड झाले – नितीन सप्रे आणि राम कनौजिया यांना राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कंत्राट देण्यात आली होती आणि या तिघांनीही जून महिन्यात सिद्दिकीचे निवासस्थान, कार्यालय वांद्रे (पश्चिम) तसेच झीशान सिद्दीकीचे वांद्रे (पूर्व) येथे कार्यालय या तीन ठिकाणची रेकी केली होती. चौकशीत त्यांनी उघड केले की, बाबा सिद्दीकीच्या हत्येचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर यांनी जूनमध्ये सप्रे आणि कनौजिया या तिघांची ओळख करून दिली होती आणि हे तिघेही एकाच महिन्यात दोनदा डोंबिवलीत आले आणि त्यांच्यासोबत वांद्रे येथे भेट दिली. सप्रे आणि कनौजिया नवी मुंबई आणि ठाण्यातील रहिवासी असल्याने, सिद्दीकीच्या हत्येचा मोठा परिणाम होईल हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या कामासाठी १ कोटींची मागणी करण्यास सुरुवात केली. पण नंतर त्याचे परिणाम खूप मोठे होतील या भीतीने या गटाने माघार घेतली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Baba Siddiqui)
कनौजिया आणि भागवत सिंह ७ जुलै रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे गेले आणि त्यांनी ११ जुलै रोजी शस्त्रे गोळा केली आणि मुंबईत परत आणली. मोहोळ, साळवे आणि कोहाड हे तिन्ही आरोपी बेरोजगार असून गुन्हेगारी कटात सहभागी असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Baba Siddiqui)
रूपेश मोहोळ यांनी बीकॉमचे तृतीय वर्ष पूर्ण केले असून त्याचे वडील ऑटोचालक आहेत. बारावीनंतर मोहोळ भंगाराचा व्यवसाय करत होता. त्याच्यावर यापूर्वी पुणे येथील स्थानिक पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. साळवे यांनी बारावी पूर्ण केली आणि त्यांच्या कुटुंबाला हॉटेल व्यवसायात मदत केली. कोहाड यांनी बारावी पूर्ण केली आहे,त्यांचे वडील लॉन्ड्रीचे दुकान चालवतात.या गुन्हयातील मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि कटाचा सूत्रधार अजूनही फरार आहेत. (Baba Siddiqui)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community