Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत काका-पुतणे आमने-सामने; शरद पवार गटाने दिली युगेंद्र पवारांना उमेदवारी

76
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत काका-पुतणे आमने-सामने; शरद पवार गटाने दिली युगेंद्र पवारांना उमेदवारी
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत काका-पुतणे आमने-सामने; शरद पवार गटाने दिली युगेंद्र पवारांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीत नणंद-भावजय सामना रंगला होता. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, तर अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या. आताही बारामती विधानसभेत कौटुंबिक लढत होणार आहे. (Ajit Pawar Vs Yugendra Pawar)

(हेही वाचा – Baba Siddiqui यांच्या हत्येच्या कटातील एक जण पुण्यातील गुंडाचा चाहता निघाला; अटकेची संख्या १४)

अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाने तिकिट दिले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार आहेत. त्यामुळे बारामतीत काका-पुतणे म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ( Ajit Pawar Vs Yugendra Pawar ) असा सामना रंगणार आहे. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे देखील अध्यक्ष आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांसाठी सक्रीय झाले. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. तसंच श्रीनिवास पवार यांनीही अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडायला नको होती, असे वक्तव्य केले होते. श्रीनिवास पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता. (Ajit Pawar Vs Yugendra Pawar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.