Ind vs NZ, 2nd Test : विराट कोहलीला जेव्हा एक नेट्स गोलंदाज क्लिनबोल्ड करतो…. 

Ind vs NZ, 2nd Test : पुणे कसोटीत पहिला दिवस संपल्यावर विराट जातीने फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता 

63
Ind vs NZ, 2nd Test : विराट कोहलीला जेव्हा एक नेट्स गोलंदाज क्लिनबोल्ड करतो…. 
Ind vs NZ, 2nd Test : विराट कोहलीला जेव्हा एक नेट्स गोलंदाज क्लिनबोल्ड करतो…. 
  • ऋजुता लुकतुके 

विराट कोहली बंगळुरू कसोटीत दुसऱ्या डावात ७० धावा करून काहीसा फॉर्ममध्ये परतला आहे. पण, किंग कोहली त्याच्या ध्येयनिष्ठेसाठी ओळखला जातो. पुणे कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्या संपल्या विराट (Virat Kohli) लगेच मैदानात उतरला होता तो फलंदाजीच्या सरावासाठी. तात्पुरत्या उभारलेल्या नेट्सवर त्याने एक तास फलंदाजीचा सराव केला. पुण्यातील स्थानिक गोलंदाज विराट कोहलीला गोलंदाजी करत होते. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- CJI D Y Chandrachud: वाढत्या प्रदूषणावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “मी…”)

जगातील कुठल्याही मोठ्या तेज गोलंदाजासाठी कर्दनकाळ असलेला विराट कोहली (Virat Kohli) चक्क एका नेट्स गोलंदाजाच्या चेंडूवर क्लिन बोल्ड झाला. आणि त्याचा ऑफ स्टंप उखडून बाहेर फेकला गेला. विराटनेही स्थानिक गोलंदाजाचं कौतुक केलं. त्यानंतर मात्र विराट सावरला. आणि त्याचे चेंडूही बॅटवर मध्यभागी बसायला लागले. (Ind vs NZ, 2nd Test)

 भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटीत भारताचा न्यूझीलंडने ८ गडी राखून पराभव केला आहे. आणि मालिकेत पुनरागमन करायचं असेल तर भारतासाठी विराट महत्त्वाचा फलंदाज आहे. बंगळुरू कसोटीत दुसऱ्या डावात ७० धावा करून विराटने फॉर्म परतल्याचं सुतोवाच केलं आहे. आता पुण्याची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी आहे. आणि इथंही त्याची कसोटी लागणार आहे. विराट फलंदाजीचा सराव करतोय म्हटल्यावर गहुंजे स्टेडिअमवर लोकांनी मात्र गर्दी केली. सामना संपल्यानंतरही लोक विराटला पहायला थांबले होते. (Ind vs NZ, 2nd Test)

 विराट सरावावेळी आपलं तंत्र सुधारण्यावर भर देताना दिसला. आणि त्याने ठरावीक फटक्यांचा सराव केला. तसंच न्यूझीलंडच्या तेज गोलंदाजांचं आव्हान समोर असल्यामुळे त्याने वेगवान माऱ्यावर जास्त वेळ सराव केला. (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.