Zeeshan Siddique यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश; वांद्रे पूर्वची उमेदवारी

116
Zeeshan Siddique यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश; वांद्रे पूर्वची उमेदवारी
Zeeshan Siddique यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश; वांद्रे पूर्वची उमेदवारी

वांद्रे पूर्व विधानसभा (bandra east assembly constituency) मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) हे अद्याप काँग्रेसमध्ये असतानाच त्यांच्या मतदारसंघात उबाठाने पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला. त्यामुळे नाराज झालेले झिशान सिद्दीकी यांनी २५ ऑक्टोबर रोजी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. झिशान यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला होता. काँग्रेसने विद्यमान आमदार असतांनाही हा मतदारसंघ उबाठा गटाला दिल्यामुळे झिशान यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आता त्यांची आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्याशी लढत होणार आहे.

(हेही वाचा – CJI D Y Chandrachud: वाढत्या प्रदूषणावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “मी…”)

झिशान यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर अजित पवार यांनी ट्वीट करत त्यांचे स्वागत केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो’, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

उबाठा गटाने वरुण सरदेसाईंना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देताच झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनी एक्सवर पोस्ट करून यावर टीका केली होती.

१२ ऑक्टोबर रोजी झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. या दुःखातून सावरत झिशान सिद्दिकी हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत, मात्र मविआने त्यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी एक्सवर संतप्त भावना व्यक्त केल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.