Ind vs NZ, 2nd Test : वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर जम बसलेल्या रचिल रविंद्रचाही त्रिफळा उडाला तो क्षण 

81
Ind vs NZ, 2nd Test : वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर जम बसलेल्या रचिल रविंद्रचाही त्रिफळा उडाला तो क्षण 
Ind vs NZ, 2nd Test : वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर जम बसलेल्या रचिल रविंद्रचाही त्रिफळा उडाला तो क्षण 
  • ऋजुता लुकतुके 

बंगळुरू कसोटीनंतर फास्टट्रॅक करून भारतीय संघात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी कमाल करताना ५९ धावांत ७ बळी मिळवले. त्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत गुंडाळला. खरंतर पहिल्या सत्रात वॉशिंग्टनला यश मिळालं नव्हतं. त्याचे चेंडूही फारसे वळत नव्हते. पण, दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात तो वेग आणि फिरकीवर किवी फलंदाजांना चकवायला लागला. त्याची चुणूक दिसली डावाच्या ६० व्या षटकात जेव्हा जम बसलेल्या रचिन रविंद्रचा (Rachin Ravindra) त्याने ६५ धावांवर त्रिफळा उडवला. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Ajit Pawar गटाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक यांना अणुशक्तीनगर पूर्वची उमेदवारी)

रचिन तेव्हा आपल्या मालिकेतील दुसऱ्या शतकासाठी सज्ज दिसत होता. मनाप्रमाणे फटके मारत होता. पण, लेग स्टंपची दिशा पकडलेला वॉशिंग्टनचा हा चेंडू इतका वळला की, रचिनच्या बॅटची अगदी हलकी कड घेऊन तो थेट यष्टीवर आदळला. रचिनलाही काही क्षण काय होतंय हे समजलं नाही. पण, अखेर त्याला मैदान सोडावं लागलं. भारतासाठी हा बळी डावाला कलाटणी देणारा ठरलाच. शिवाय दिवसभरातील हा सर्वोत्तम चेंडू ठरावा. (Ind vs NZ, 2nd Test)

वॉशिंग्टनची ही भारतासाठी पाचवी कसोटी आहे. पुनरागमनात त्याने दमदार कामगिरी करत रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) विक्रमाशी बरोबरी केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय गोलंदाजाची आधुनिकी क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. अश्विननेही २०१७ मध्ये किवी संघाविरुद्ध ५९ धावांत ७ बळी नोंदवले होते. तर भारताकडून न्यूझीलंड विरुद्ध सर्वकालीन सर्वोत्तम कामगिरी वेंकटराघवन यांनी केली आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

एस वेंकटराघवन – ७२/८ (नवी दिल्ली, १९६५)

इरापल्ली प्रसन्ना – ७६/८ (ऑकलंड, १९७५)

रविचंद्रन अश्विन – ५९/७ (इंदूर, २०१७)

वॉशिंग्टन सुंदर – ५९/७ (पुणे, २०२४)

 इतकंच नाही तर कसोटीच्या एका डावात सर्वच्या सर्व १० बळी फिरकीपटूंनी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. अपवाद अनिल कुंबळेच्या १० बळी मिळवण्याच्या कामगिरीचा. बाकी दोनच फिरकीपटू आणि ते ही ऑफ स्पिनर यांनी १० बळी घेतल्याची घटना कसोटीत प्रथमच घडली आहे. ‘या मालिकेत खेळायला मिळावं, ती माझ्यासाठी सर्वोत्तम संधी असेल असं आधीपासून वाटत होतं. माझं स्वप्न पूर्ण झालं. उजव्या हाताच्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांना कशी फलंदाजी करायची याचा मी विशेष अभ्यास केला होता. त्याप्रमाणे मी मनगटाच्या हालचालींचा वापर करून गोलंदाजी केली. त्याचा फायदा झाला हे महत्त्वाचं,’ असं वॉशिंग्टनने दिवसाच्या खेळानंतर बोलून दाखवलं.  (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.