कोरोना काळ आठवा, मविआला दंडित करण्यासाठी मतदान करा; Ashish shelar यांचे आवाहन

56
कोरोना काळ आठवा, मविआला दंडित करण्यासाठी मतदान करा; Ashish shelar यांचे आवाहन
कोरोना काळ आठवा, मविआला दंडित करण्यासाठी मतदान करा; Ashish shelar यांचे आवाहन

दहिसर विधानसभेच्या उमेदवार मनिषा चौधरी यांच्या प्रचारार्थ दहिसर येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह भाजपाचे, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइंचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish shelar) यांनी मविआवर निशाणा साधला.

(हेही वाचा-Ajit Pawar गटाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक यांना अणुशक्तीनगर पूर्वची उमेदवारी)

कोरोना काळात ज्यांनी मृताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले अशा भ्रष्टाचाऱ्यांना दंडित करण्याची संधी आहे, मतदाराने ही संधी गमावून चालणार नाही. म्हणून महाविकास आघाडी नामक भ्रष्टाचाऱ्यांना दंडित करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन अॅड. आशिष शेलार (Ashish shelar) यांनी केले.

(हेही वाचा-CJI D Y Chandrachud: वाढत्या प्रदूषणावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “मी…”)

यावेळी आमदार अँड आशिष शेलार (Ashish shelar) म्हणाले की, या निवडणुकीत कोरोना काळ आठवा, कारण त्या काळातील अनेक गोष्टींचा हिशेब चुकता करण्याची संधी आता मतदाराला आहे. जेव्हा लोक अँब्युलन्स, खाटा, औषधे आणि उपचारासाठी तडफडत होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचे बगलबच्चांची कंत्राटे मिळवण्यासाठी स्पर्धा लागली होती. औषधे, कोविड सेंटर पासून मृतांच्या कफना पर्यंत प्रत्येक गोष्टीत कटकमिशन खाण्याचे धंदे करणारे आपण पाहिले आहे. त्यांना आता दंडित करण्याची संधी आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या महाविकास आघाडीला हरवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले.

(हेही वाचा-Assembly Election 2024 : मतदार यादीत मतदारांनी कुठे जाऊन नाव तपासून घ्यावे, जाणून घ्या!)

दरम्यान, त्यापुर्वी त्यांनी मालाड येथे जाऊन भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच 9 व्या टर्मच्या विजयाचा विक्रम करण्यासाठी सज्ज असलेले आमदार कालिदास कोळंबकर आणि मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांची सकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शुभेच्छा दिल्या. (Ashish shelar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.