मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे मुंबईतील माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरे कामला लागल्याचे दिसून आले. अमित ठाकरेंनी माहिममध्ये मेळावा घेत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी माहीम विधानसभा जिंकून साहेबांना भेट द्यायची आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा-कोरोना काळ आठवा, मविआला दंडित करण्यासाठी मतदान करा; Ashish shelar यांचे आवाहन)
अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंना (uddhav Thackeray) लक्ष केले. अमित ठाकरे म्हणाले, “2017 मध्ये सेनेने 7 पैकी 6 नगरसेवक मी आजारी असताना फोडले, हे खोके खोके बोलतात, त्यांनी किती खोके दिले हे मलाही माहिती आहे. ते कसे आहेत, तेव्हाच मला कळलं. त्यामुळे अशा लोकांपासून थोड दूर राहिलेलं बरं.”
(हेही वाचा-आमचे फटाके २३ नोव्हेंबरला फुटणार; Amit Thackeray नी व्यक्त केला विश्वास)
“माहीम मतदार संघातील विषय माझे तोंडपाठ आहेत, माहीम पोलिस कॉलनी, कोळी बांधवांची वसाहत, दादर माहीम समुद्र किनारा, मिठी नदी आणि आजच्या रस्त्यांची दुरावस्था हे माझ्यासाठी प्रमुख विषय असतील. मी इतरांनी काय नाही केलं हे सांगण्यापेक्षा मी काय करू शकतो हेच लोकांना सांगणार.” असं अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community