CM Yogi Adityanath: सणासुदीच्या काळात वीज, गॅसबाबत योगी सरकारने केली मोठी घोषणा!

64
CM Yogi Adityanath: सणासुदीच्या काळात वीज, गॅसबाबत योगी सरकारने केली मोठी घोषणा!
CM Yogi Adityanath: सणासुदीच्या काळात वीज, गॅसबाबत योगी सरकारने केली मोठी घोषणा!

दिवाळी सण जवळ आला आहे. सर्व राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि राज्यातील जनतेला दिवाळी भेटवस्तू देत आहेत. काहींनी गॅस सिलिंडर मोफत तर काहींनी २४ तास वीज देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला असतानाच, आता त्यांनी राज्यातील जनतेलाही दिवाळी भेट दिली आहे. 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत एका मिनिटासाठीही यूपीमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही. २४ तास वीज असेल. उज्ज्वला गॅस कनेक्शन असणाऱ्यांना मोफत सिलिंडर मिळणार आहे. (CM Yogi Adityanath)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आगामी दिवाळी सणासंदर्भात राजधानी लखनऊमध्ये बैठक घेतली. यावेळी त्यांनी शासन व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. रक्षाबंधन, जन्माष्टमी, दुर्गापूजा, दसरा किंवा मोहरम आदी सणांवर राज्यातील वातावरण चांगलेच असल्याचे मुख्यमंत्री योगी म्हणाले. (CM Yogi Adityanath)

पोलीस आणि प्रशासन सतर्कतेवर- मुख्यमंत्री योगी
येत्या काही दिवसांत धनत्रयोदशी, अयोध्या दीपोत्सव, दीपावली, भाऊबीज, देवोत्थान एकादशी, वाराणसी देव दीपावली आणि छठ महापर्व असे विशेष सण आहेत. याशिवाय अयोध्येत पंचकोशी, 14 कोसी परिक्रमा, कार्तिक पौर्णिमा स्नान इत्यादी मेळ्यांचेही आयोजन केले जाते. शांतता, सुरक्षा आणि सुशासनाच्या दृष्टीने हा काळ संवेदनशील आहे. या सणांच्या काळात पोलीस आणि प्रशासनासह यूपीच्या संपूर्ण टीमला 24×7 सतर्क राहावे लागेल. असं योगी म्हणाले. (CM Yogi Adityanath)

19 दिवस वीज 24 तास उपलब्ध असेल
त्याचबरोबर सीएम योगींनी वीज विभागालाही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सीएम योगी म्हणाले की, 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात 24 तास वीजपुरवठा खंडित न होता. कुठेही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता विभागाने घ्यावी. याबाबत वीज महामंडळाने आवश्यक ती तयारी करावी, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. सीएम योगींच्या या आदेशानंतर आता यूपीच्या जनतेला 19 दिवस 24 तास वीज मिळणार आहे. मग तो ग्रामीण भाग असो वा शहरी भाग. (CM Yogi Adityanath)

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर
बैठकीत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, ‘उज्ज्वला योजने’च्या सर्व लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी मोफत LPG सिलिंडर मिळाले पाहिजे. यामध्ये कोणत्याही स्तरावर विलंब होता कामा नये. एजन्सींशी समन्वय साधा आणि ‘उज्ज्वला योजने’च्या सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर मोफत सिलिंडर मिळवून द्या. सीएम योगी म्हणाले की, सण आणि उत्सव पाहता लोकांची ये-जा वाढेल. मोठ्या संख्येने लोक आपापल्या घरी जातात. अशा स्थितीत परिवहन विभागाने ग्रामीण मार्गांवर बसेसची संख्या वाढवावी. खराब स्थितीत असलेल्या बसेस कधीही रस्त्यावर धावू देऊ नका. असं ते म्हणाले. (CM Yogi Adityanath)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.