Maharashtra तील १ हजार ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट

33
Maharashtra तील १ हजार ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट
Maharashtra तील १ हजार ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट

महाराष्‍ट्रातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्‍ह्यांतील तब्‍बल १ सहस्र ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट आहे. वर्ष २०२० पासून राज्‍यातील नक्षलग्रस्‍त भागांमध्‍ये नक्षलवाद्यांनी एकूण ५१ आक्रमणे करून ३० जणांची हत्‍या केली. यात ३ पोलिसांचाही समावेश आहे. नक्षलवाद्यांच्‍या आक्रमणात ४४ पोलीस घायाळ झाले. येत्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍याच्‍या गृह विभागाने राज्‍य सरकारला सादर केलेल्‍या गोपनीय अहवालामध्‍ये ही माहिती देण्‍यात आली आहे. हे वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Ind vs NZ, 2nd Test : न्यूझीलंडच्या गहुंजे स्टेडिअमवर १०० मिली पाण्यासाठी मोजावे लागत होते ८० रुपये )

गृहविभागाच्‍या या गोपनीय अहवालामध्‍ये येत्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर नक्षलवाद्यांनी केलेल्‍या कारवाईंची माहिती देण्‍यात आली आहे. या अहवालानुसार गडचिरोली जिल्‍ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या मतदारसंघांतील ९७२, तर गोंदिया जिल्‍ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि आमगाव येथील १११ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. वर्ष २०२० पासून राज्‍यातील नक्षलग्रस्‍त भागांत नक्षलवाद्यांनी १२ ठिकाणी जाळपोळ केली आहे.

आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांकडून झाली आक्रमणे !

२०१९ मध्‍ये लोकसभा निवडणुकीच्‍या आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांनी ४ जणांची हत्‍या केली. यात एका पोलिसाचा समावेश होता. लोकसभा आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांनी ६ ठिकाणी जाळपोळ केली. या आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांच्‍या आक्रमणात १२ जण गंभीर जखमी झाले होते. वर्ष २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांनी एका व्‍यक्‍तीची हत्‍या केली, तसेच एका ठिकाणी जाळपोळ केली होती. या कालावधीत नक्षलवाद्यांच्‍या आक्रमणात ४ जण गंभीर घायाळ झाले. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.