Pune News : पुणे पोलिसांना नाकाबंदीत सापडला सोन्याने भरलेला ट्रक; १३८००००००० चा ऐवज जप्त

145
Pune News : पुणे पोलिसांना नाकाबंदीत सापडला सोन्याने भरलेला ट्रक; १३८००००००० चा ऐवज जप्त
Pune News : पुणे पोलिसांना नाकाबंदीत सापडला सोन्याने भरलेला ट्रक; १३८००००००० चा ऐवज जप्त

काही दिवसांपूर्वी पुण्यात (Pune News) खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. (Pune News)

(हेही वाचा-CM Yogi Adityanath: सणासुदीच्या काळात वीज, गॅसबाबत योगी सरकारने केली मोठी घोषणा!)

एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात सोन्याचे दागिने सापडले आहेत. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास आता पोलीस करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे. (Pune News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.