World Wrestling Championship : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून भारताने माघार का घेतली?

World Wrestling Championship : कुस्ती फेडरेशनने भारताचा संघच न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

82
World Wrestling Championship : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून भारताने माघार का घेतली?
  • ऋजुता लुकतुके

आगामी कुस्ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आपला संघ न पाठवण्याचा निर्णय भारतीय कुस्ती फेडरेशनने घेतला आहे. कुस्ती फेडरेशनच्या कारभारात वारंवार सरकारी हस्तेक्षेप होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर फेडरेशनने आंदोलनकर्ते खेळाडू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यावरही टीका केली आहे. या खेळाडूंच्या आंदोलनामुळेच कुस्ती फेडरेशनवर बरखास्तीची वेळ आली, असं फेडरेशनने म्हटलं आहे. (World Wrestling Championship)

भारतीय कुस्तीसाठी मागचं अख्खं वर्ष वादांनी भरलेलं गेलं आहे आणि फेडरेशनमध्ये खेळापेक्षा राजकारणच जास्त बघायला मिळालं आहे. २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान अल्बानियातील तराना इथं कुस्तीची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. काही दिवसांपूर्वी कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग यांनी ६ आणि ७ ऑक्टोबरला आयोजित केलेली निवड चाचणी स्पर्धा रद्द केली होती. दिल्ली उच्च न्यायालयानेही अशी निवड चाचणी स्पर्धा कुस्ती फेडरेशनला भरवता येणार नाही, असा निर्वाळा दिला होता. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असलेल्या संघटनेलाच निवड चाचणी स्पर्धा भरवता येईल, असं न्यायालयाने म्हटलं होतं. (World Wrestling Championship)

(हेही वाचा – Shivendra Raje Bhosale यांचे टिकास्त्र, शरद पवारांमुळे मराठा आरक्षण प्रश्न चिघळला)

आता कुस्ती फेडरेशनने यावर टोकाचं पाऊल उचललं आहे. खेळाडूंनाच अजिंक्यपद स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याशिवाय जागतिक कुस्ती फेडरेशनला पत्र लिहून संजय सिंग यांनी आपली बाजू मांडली आहे. ‘कुस्ती फेडरेशनच्या कारभारात क्रीडा मंत्रालयाची ढवळाढवळ आहे. आम्हाला स्वायत्तपणे निर्णय घेता येत नाहीत. तसंच क्रीडा मंत्रालयाने फेडरेशन बरखास्त करून तात्पुरती समितीही नेमली आहे. अशावेळी आम्हाला संघ निवडीचा अधिकारही उरलेला नाही,’ असं संजय सिंग आपल्या पत्रात म्हणतात. (World Wrestling Championship)

साक्षी, विनेश, बजरंग आणि सत्यवान या चार खेळाडूंनी न्यायालयात अपील करत कुस्ती फेडरेशनच्या कारभारासाठी समिती नेमावी अशी मागणी केली आहे. त्यावर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयानेही ऑलिम्पिक असोसिएशनला आणखी एक तात्पुरती समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. या परिस्थितीकडे संजय सिंग यांनी लक्ष वेधलं आहे. क्रीडा मंत्रालयाने डिसेंबर २०२३ मध्येच नवनिर्वाचित कुस्ती कार्यकारिणी बरखास्त केली होती. (World Wrestling Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.