Lionel Messi : लायनेल मेस्सीची कमाई अमेरिकेतील २२ क्लबच्या मिळून कमाईपेक्षा जास्त!

Lionel Messi : मेस्सीला इंटर मियामीकडून २०२४ वर्षात २०.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका मोबदला मिळाला. 

48
Lionel Messi : लायनेल मेस्सीची कमाई अमेरिकेतील २२ क्लबच्या मिळून कमाईपेक्षा जास्त!
  • ऋजुता लुकतुके

लायनेल मेस्सीची (Lionel Messi) मैदानावरील कामगिरी जशी चढती असते तसा त्याचं बँक खातंही फुगतं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. सध्या तो अमेरिकेत मेजर लीग सॉकरमध्ये इंटर मियामी क्लबकडून खेळतो. २०२४ मध्ये त्याला या क्लबकडून २०.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका मोबदला मिळाला. त्याचा मूळ करार हा १२ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा आहे. पण, त्यात इतर भत्ते, बक्षिसाची रक्कम मिळून आणखी ८० लाख अमेरिकन डॉलरची भर पडली आहे. त्यामुळे त्याला विक्रमी रक्कमही मिळाली आहे. पण, यात गंमत ही आहे की, एकट्या मेस्सीला लीगमधील इतर २२ संघातील खेळाडूंना मिळून जितकी रक्कम मिळाली त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.

(हेही वाचा – Shivendra Raje Bhosale यांचे टिकास्त्र, शरद पवारांमुळे मराठा आरक्षण प्रश्न चिघळला)

मेस्सीच्या (Lionel Messi) तुलनेत ऑलिव्हर गिरॉडला ३.४ दशलक्ष डॉलर तर सर्जिओ बस्कला ८.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका मोबदला मिळाला आहे. मेस्सीच्या या मोठ्या रकमेमुळे इंटर मियामीचा खेळाडूंवरील खर्चही ४१.७ दशलक्ष अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. मियामीनंतर टोरँटो, लॉस एंजलीस आणि नॅशविल या क्लबचा क्रमांक लागतो.

(हेही वाचा – World Wrestling Championship : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून भारताने माघार का घेतली?)

सिनसिनाटी आणि ह्यूस्टन हे इतर दोन संघ आहेत ज्यांनी खेळाडूंवर २० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. बाकी सगळ्या क्लबचा खर्चाचा आकडा हा मेस्सीपेक्षा म्हणजे २० दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा कमीच आहे. खेळाडूंचं म्हणाल तर मेस्सीनंतर थेट क्रमांक लागतो तो सर्जिओ बस्कचा. त्याच्यासाठी मियामीच्याच क्लबने ८.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर मोजले आहेत. तर लॉरेन्सो इनसाईनसाठी टोरँटो क्लबने ७.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर मोजले आहेत. ह्यूस्टन क्लबने एझिक्विल पॉन्सला २.८८ दशलक्ष अमेरिकन डॉलर देऊ घेतलं आहे. पण, या सगळ्यांपेक्षा मेस्सी (Lionel Messi) कितीतरी पुढे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.