- खास प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यावर गेली अडीच वर्षे सतत ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणा देउन डिवचणाऱ्या शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) मित्रपक्षाकडूनच घरचा आहेर मिळाला.
ऐतिहासिक बंड
गेल्या अडीच वर्षात शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) प्रत्येक कार्यक्रमात शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांना साथ देणाऱ्या अन्य ३९ आमदारांवर भाजपाकडून ५० खोके घेऊन पक्ष फोडल्याचा आरोप करण्यात येतो. आज तोच आरोप उबाठा नेत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने केला.
(हेही वाचा – Assembly Election : मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडी कडून केवळ ६० टक्केच जागांवर उमेदवार निश्चित)
रोख ‘मातोश्री’वर
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे तिकीट खोके घेऊन अनुराधा नागवडे यांना विकल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते माजी आमदार राहुल जगताप यांनी केला. जगताप यांनी राऊत यांचे नाव घेतले असले तरी त्यांचा रोख हा ‘मातोश्री’वर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण विधानसभेच उबाठाचे (Shiv Sena UBT) तिकीट देण्याचा अधिकार हा फक्त उद्धव ठाकरे यांनाच आहे.
‘द्या खोके आणि उमेदवारी एकदम ओके’
या तिकीट वाटपात उपनेते साजन पाचपुते यांनी मध्यस्थी केल्याचा आरोपही जगताप यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा देत राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी मुंबईत शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) गटात प्रवेश केला. आणि लगेचच त्यांना श्रीगोंदा मतदारसंघासाठी एबी फॉर्मही देण्यात आला. त्यावर जगताप यांनी संजय राऊत यांच्यावर थेट आरोप करत ‘द्या खोके आणि उमेदवारी एकदम ओके’, असे सूत्र राऊत राबवत असल्याचे म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community