भाजपाचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला होता. त्यावर शुक्रवार, २५ ऑक्टोबर रोजी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कारागृहाची शिक्षा सुनावली होती. त्यांना अटक आणि सुटका करण्यात आली.
Medha Kirit Somaiya Defamation Case
Sessions Court Mumbai today admitted Appeal of Sanjay Raut against 15 Days Conviction Order of Magistrate Court.
Court/Police took Custody of #SanjayRaut
He is to be released on ₹50,000 Bail @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 25, 2024
मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले. संजय राऊत यांना न्यायालयाने 15 दिवसांच्या कारावासाची आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
(हेही वाचा आता धर्मांध मुसलमानांचा ‘ग्रंथालय जिहाद’ व्हाया Love Jihad; तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर)
काय होता आरोप?
मीरा-भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणी 2022 मध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांशी संबंधीत संस्थेने 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते. यानंतर मेधा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता
अटक आणि सुटका
याप्रकरणी संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राऊत यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. त्यांची अटक आणि सुटका करण्यात आली.
Join Our WhatsApp Community